Join us

Sunlite Recycling Share Price : IPO नं केला पैसा दुप्पट; धमाकेदार लिस्टिंगनंतर 'या' शेअरची डिमांड वाढली; लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:18 AM

Sunlite Recycling Share Price : आयपीओसाठी प्राइस बँड १०५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ग्रे मार्केटमधून मजबूत लिस्टिंगची चिन्हंही सातत्यानं दिसत होती. धमाकेदार लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं.

Sunlite Recycling Industries shares : सनलाइट रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या आयपीओचं आज धमाकेदार लिस्टिंग झालं. एनएसई एलएमईवर कंपनीची लिस्टिंग आज ९० टक्के प्रीमियमसह १९९ रुपयांवर झाली. आयपीओसाठी प्राइस बँड १०५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ग्रे मार्केटमधून मजबूत लिस्टिंगची चिन्हंही सातत्यानं दिसत होती. धमाकेदार लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं.

पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट झाले

लिस्टिंगनंतर शेअर्सला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यानंतर एनएसई एसएमईमध्ये शेअरचा भाव २०९.४५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. लिस्टिंगनंतर अपर सर्किटमुळे आयपीओच्या वेळी ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे मिळाले होते, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत.६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत खुला होता.

हा आयपीओ १६ ऑगस्ट रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना २० ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. कंपनीनं प्रति शेअर १०० ते १०५ रुपये प्राइस बँड निश्चित केला होता. त्याचबरोबर एका लॉटमध्ये १२०० शेअर्स होते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १,२६,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

हा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांच्या सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ८.५९ कोटी रुपये उभे केलेत. आयपीओची साईज ३०.२४ कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून २८.८० लाख नवीन शेअर्स जारी केले आहेत.

३१० पटींपेक्षा अधिक सब्सक्रिप्शन

३ दिवसांच्या सब्सक्रिप्शनदरम्यान हा आयपीओ ३१० पटींपेक्षा अधिक वेळा सब्सक्राइब करण्यात आला. शेवटच्या दिवशी हा आयपीओ २८२.४५ पट सब्सक्राइब झाला. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे ८.३८ पट आणि २७.७४ पट सब्सक्रिप्शन मिळालं होतं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक