Join us

रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 11:57 AM

Rail Vikas Nigam Ltd Share : कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी रेल्वे कंपनीचा शेअर १३ टक्क्यांहून अधिक वाढून ५६७.६० रुपयांवर पोहोचला. यानंतर या शेअरनं उच्चांकी पातळी गाठली.

Rail Vikas Nigam Ltd Share : रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी रेल्वे कंपनीचा शेअर १३ टक्क्यांहून अधिक वाढून ५६७.६० रुपयांवर पोहोचला. यानंतर रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनं उच्चांकी पातळी गाठली. रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये ५ दिवसांत ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, गेल्या ६ महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये २०५ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी ११७.३५ रुपये आहे.

काय आहे शेअरची स्थिती?

रेल विकास निगम लिमिटेडच्या (आरव्हीएनएल) शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत मोठी वाढ झाली. २७ मार्च २०२० रोजी रेल विकास निगमचा शेअर १२.८० रुपयांवर होता. ८ जुलै २०२४ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर ५६७.६० रुपयांवर पोहोचला आहे. या काळात रेल विकास निगम लिमिटेडचे समभाग ४२०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. जर एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या १ लाख रुपयांचं मूल्य आज ४४.३४ लाख रुपये झालं असतं.

वर्षभरात ३३५ टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेडचे समभाग ३५५ टक्क्यांनी वधारले आहेत. १० जुलै २०२३ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर १२२.२५ रुपयांवर होता. ८ जुलै २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर ५६७.६० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये २०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रेल्वे कंपनीच्या शेअर्सने तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. रेल्वे विकास निगम लिमिटेडचे शेअर्स तीन महिन्यांत ११३ टक्क्यांहून अधिक वधारलेत. ८ एप्रिल २०२४ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर २६४.३५ रुपयांवर होता. ८ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५६७.६० रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक