Join us  

Suzlon Energy: १८ महिन्यांत ९००% रिटर्न देणाऱ्या शेअरमध्ये तुफान तेजी, सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 1:30 PM

Suzlon Energy Share Price: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअर्सनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग ३ दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे.

Suzlon Energy Share Price: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. विशेष म्हणजे सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग ३ दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. बुधवारी (११ सप्टेंबर) बाजार उघडल्यानंतर हा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि ८१.९५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर ८४.४० रुपये आहे. सलग तीन दिवस या शेअरमध्ये तेजी नोंदवली जात आहे.

सुझलॉनच्या शेअरमधील तेजीमागे दोन कारणं आहेत. एक तर ब्रोकरेज फर्मकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग मिळालं आहे, दुसरे म्हणजे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून १,१६६ मेगावॅटचं भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जेचं कंत्राट मिळाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बातमीनंतरच तीन दिवसांपासून शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

कंपनीची ऑर्डरबुक वाढली

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, सुझलॉन गुजरातमधील एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या (एनजीईएलची पूर्ण मालकीची उपकंपनी) दोन प्रकल्पांमध्ये आणि इंडियन ऑईल एनटीपीसी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनजीईएलची समूह कंपनी) एका प्रकल्पात सुझलॉन ३.१५ मेगावॅट क्षमतेचे हायब्रीड लॅटिस ट्यूबलर (एचएलटी) टॉवर आणि एस१४४ चे एकूण ३७० पवन टर्बाइन जनरेटर (डब्ल्यूटीजी) स्थापित करेल. या करारामुळे सुझलॉनची ऑर्डर बुक ३ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुमारे ५ गिगावॅटपर्यंत वाढली आहे.

Suzlon Energy ला मिळालं Overweight रेटिंग

अलीकडेच परदेशी ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं शेअरवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवलं आगे. जरी त्यांची टार्गेट प्राईज ७३.४ रुपये असली, तरी शेअरनं त्याला मागे टाकलं आहे. पण ओव्हरवेट रेटिंग, स्ट्राँग ऑर्डर बुक यामुळे सुझलॉन सध्या गुंतवणूकदारांच्या आवडत्या शेअर्सपैकी एक बनत आहे.

कशी आहे प्राईज हिस्ट्री?

सुझलॉनच्या शेअर्सनी कामगिरी दाखवली आहे. गेल्या १८ महिन्यांत या शेअरनं ९०० टक्के म्हणजेच ९ पट परतावा दिला आहे. म्हणजेच गेल्या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान याची किंमत ८ ते ९ रुपयांच्या रेंजमध्ये होती, पण इथून हा शेअर सातत्यानं वधारला असून गेल्या १८ महिन्यांत ९०० टक्क्यांनी वधारला आहे. गुंतवणूकदारांना १ वर्षात २४१ टक्के परतावा मिळाला आहे. यंदा आतापर्यंत त्यात ११२ टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत त्यात १०८ टक्के वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक