Join us  

₹400 चा शेअर आपटून ₹24 वर आला, आता पुन्हा बनला रॉकेट; 6 महिन्यांत दिला 205% परताना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 3:58 AM

वर्षभरात या एनर्जी शेअरने 200.12% आणि पाच वर्षांत 293.55% चा परतावा दिला आहे.

या वर्षांत ज्या शेअर्सची बाजारात सर्वाधिक चर्चा झाली. त्यांतील एक शेअर म्हणजे, सुझलॉन एनर्जी. या वर्षात सुझलॉन एनर्जीचा शेअर YTD मध्ये 128.04 टक्क्यांनी वधारला आहे. तो सध्या 24.40 रुपयांवर आहे. हा शेअर स्टॉक एक्सचेन्जवर तेजी पकडताना दिसत आहे. तसेच, याच्या बॅलेन्स शीटमध्येही सुधारणा होतानाही दिसत आहे.  

6 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिकचा परतावा - सुजलॉन एनर्जीच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 205 टक्क्यांचा परताना दिला आहे. या दरम्यान या शेअरची किंमत 8 रुपयांवरून 24.40 रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरात या एनर्जी शेअरने 200.12% आणि पाच वर्षांत 293.55% चा परतावा दिला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 27 रुपये एवढा आहे. हा उच्चांक शेअरने 31 ऑगस्ट 2023 मध्ये गाठला होता. तसेच, 52 आठवड्यांतील निचांक 6.60 रुपये एवढा आहे. अर्थात हा शेअर सध्या आपल्या निचांकी पातळीच्या तुलनेत 269.7 टक्क्यांनी रिकव्हर झाला आहे. या शेअरचे मार्केट कॅप 33,003.03 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक