Join us  

सुझलॉन एनर्जीच्या नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ, शेअर ९ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 1:14 PM

कामकाजादरम्यान सुझलॉन एनर्जीचे शेअर्स जून 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर होते.

Suzlon Energy Share Price: पवन ऊर्जा कंपनी सुझलॉन एनर्जीचा शेअर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान 5 टक्क्यांनी वधारला आणि बीएसईवर 34.44 रुपयांच्या नऊ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. कंपनीनं वार्षिक आधारावर करानंतरच्या नफ्यात 82 टक्के वाढ नोंदवली आहे. मुख्यतः खर्चात घट झाल्यामुळे कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 102 कोटी रुपयांचा नफा नोंदवला.कंपनीने वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत 56 कोटी रुपयांचा PAT पोस्ट केला होता. सुझलॉन एनर्जीच्या या अपडेटनंतर गुंतवणूकदारांनी शेअर्सकडे मोर्चा वळवला. शुक्रवारी 33.08 रुपयांवर उघडल्यानंतर, या स्टॉकने काही वेळात 34.44 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. कामकाजादरम्यान सुझलॉन एनर्जीचे शेअर्स जून 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर होते. 23 ऑक्टोबर रोजी गाठलेल्या 34.10 रुपयांच्या उच्चांकी स्तरालादेखील आता मागे टाकलं आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 6.96 रुपये आहे.मार्केट व्हॅल्यू 335 टक्क्यांनी वाढलीआर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत सुझलॉन एनर्जीची मार्केट व्हॅल्यूदेखील 335 टक्क्यांनी वाढली आहे. दुसऱ्या तिमाहित सुझलॉन एनर्जीचा नेट रेव्हेन्यू एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 1430 कोटी रुपयांवरून घसरुन 1417 कोटी रुपये झाला. उत्तम मार्जिनमुळे अधिक एबिटा नोंदवला असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक