Lokmat Money >शेअर बाजार > ₹4 च्या एनर्जी शेअरची 'हवा'! केवळ 5 वर्षांत दिलाय 1400% बंपर परतावा; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

₹4 च्या एनर्जी शेअरची 'हवा'! केवळ 5 वर्षांत दिलाय 1400% बंपर परतावा; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

एप्रिल-जून दरम्यान सुझलॉन एनर्जीचा नेट प्रॉफिट 200% ने वाढून ₹300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाला आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 05:03 PM2024-07-24T17:03:10+5:302024-07-24T17:03:27+5:30

एप्रिल-जून दरम्यान सुझलॉन एनर्जीचा नेट प्रॉफिट 200% ने वाढून ₹300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाला आहे...

Suzlon Energy ₹ 4 share give 1400% bumper returns in just 5 years; Investors flock to buy | ₹4 च्या एनर्जी शेअरची 'हवा'! केवळ 5 वर्षांत दिलाय 1400% बंपर परतावा; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

₹4 च्या एनर्जी शेअरची 'हवा'! केवळ 5 वर्षांत दिलाय 1400% बंपर परतावा; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी दिसत आहे. कंपनीच्या शेअरला बुधवारीही 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आणि तो पहिल्यांदाच ₹60 वर पोहोचला. जून तिमाहीच्या निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी आल्याचे बोलले जाते. एप्रिल-जून दरम्यान सुझलॉन एनर्जीचा नेट प्रॉफिट 200% ने वाढून ₹300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाला आहे. तसेच कंपनीचा महसूलही 50 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीची डिलिव्हरीदेखील सात वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर आहे.

काय म्हणते कंपनी? -
सुझलॉन समुहाचे सीएफओ हिमांशू मोदी म्हणाले, मार्च तिमाहीमध्ये कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या तिमाहीत सुझलॉनचे मार्जिनल 17.5% राहिले. तसेच मोदी यांच्या मते, कंपनी 17% ते 18% दरम्यान मार्जिन बँड कायम ठेवू शकते. या तिमाहीच्या अखेरीस सुझलॉनने 3.8 गीगावॅट एवढी सर्वोच्च ऑर्डर बुक केली आहे. जी 18-24 महिन्यांत वितरित करणे आवश्यक आहे.

अशी आहे शेअरची स्थिती -
बुधवारी सुझलॉनच्या शेअरमध्ये बऱ्याच ब्लॉक डील झाल्या. यात कंपनीच्या 227 कोटी रुपयांच्या 0.3% इक्विटीमध्ये बदल झाला. हा शेअर वर्षभरात 205% ने वधारला आहे. या काळात या शेअरची किंमत 20 रुपयांनी वाढून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. हा शेअर केवळ पाच वर्षांतच 1400% वर्यंत वधारला आहे. या काळात हा शेअर चार रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Suzlon Energy ₹ 4 share give 1400% bumper returns in just 5 years; Investors flock to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.