सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी दिसत आहे. कंपनीच्या शेअरला बुधवारीही 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आणि तो पहिल्यांदाच ₹60 वर पोहोचला. जून तिमाहीच्या निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी आल्याचे बोलले जाते. एप्रिल-जून दरम्यान सुझलॉन एनर्जीचा नेट प्रॉफिट 200% ने वाढून ₹300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाला आहे. तसेच कंपनीचा महसूलही 50 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीची डिलिव्हरीदेखील सात वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
काय म्हणते कंपनी? -सुझलॉन समुहाचे सीएफओ हिमांशू मोदी म्हणाले, मार्च तिमाहीमध्ये कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या तिमाहीत सुझलॉनचे मार्जिनल 17.5% राहिले. तसेच मोदी यांच्या मते, कंपनी 17% ते 18% दरम्यान मार्जिन बँड कायम ठेवू शकते. या तिमाहीच्या अखेरीस सुझलॉनने 3.8 गीगावॅट एवढी सर्वोच्च ऑर्डर बुक केली आहे. जी 18-24 महिन्यांत वितरित करणे आवश्यक आहे.
अशी आहे शेअरची स्थिती -बुधवारी सुझलॉनच्या शेअरमध्ये बऱ्याच ब्लॉक डील झाल्या. यात कंपनीच्या 227 कोटी रुपयांच्या 0.3% इक्विटीमध्ये बदल झाला. हा शेअर वर्षभरात 205% ने वधारला आहे. या काळात या शेअरची किंमत 20 रुपयांनी वाढून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. हा शेअर केवळ पाच वर्षांतच 1400% वर्यंत वधारला आहे. या काळात हा शेअर चार रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)