Join us

Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:27 AM

Suzlon Energy Share Price : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. पण शेअर बाजारात कामकाजादरम्यान तेजी दिसून आली. काय आहे यामागचं कारण?

Suzlon Energy Share Price : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. पण शेअर बाजारात कामकाजादरम्यान तेजी दिसून आली. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये (suzlon energy share price) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, सुझलॉन एनर्जीचे  शेअर्स फोकसमध्ये होते.

अस्थिर बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शन कायम आहे. विंड एनर्जी स्टॉक Suzlon Energy Ltd चे शेअर्स आहेत फोकसमध्ये आहेत. मजबूत तिमाही निकाल असूनही या शेअरमध्ये यापूर्वी घसरण झाली होती, ज्याचं कारण कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल असावा असं म्हटलं जात आहे. गेल्या महिनाभरात सुझलॉन एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.

सुझलॉन एनर्जीच्या शेअरला (suzlon energy share) गुरुवारी ५ टक्क्यांच्या वाढीसह अपर सर्किट लागलं आणि त्याचा भाव ५६.७३ रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये सातत्यानं होत असलेली घसरण गुरुवारी थांबली आणि त्यात पुन्हा खरेदी दिसून आली. या कंपनीचं मार्केट कॅप ७७.४२ हजार कोटी रुपये आहे. अलीकडेच एफआयआयनं या शेअरमध्ये खरेदी करत आपला हिस्सा वाढवला.

व्यवस्थापनात बदल

कंपनीचे तिमाही निकाल दमदार असले तरी कंपनीच्या व्यवस्थापनात काही बदल झाले. नुकताच सुझलॉनचे सीईओ ईश्वरचंद मंगल यांनी २८ वर्षे कंपनीत सेवा बजावल्यानंतर राजीनामा दिला. उत्पन्नाच्या बाबतीत, रिन्युएबल एनर्जी कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ (Q2 FY25) साठी दुसऱ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफ्यात ९५.७२ टक्के वाढ नोंदवली.

नफा वाढला

या दरम्यान कंपनीचा नफा २००.२० कोटी रुपये झाला. यापूर्वी याच कालावधीत कंपनीला १०२.२९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. ऑपरेशनल रेव्हेन्यू देखील या कालावधीत १४१७.२१ कोटी रुपयांवरुन ४७.६८ टक्क्यांनी वाढून दुसऱ्या तिमाहीत २,०९२.९९ कोटी रुपये झाला. EBITDA मध्ये सलग वर्ष दर वर्षात तेजी दिसून आली, जी २९४ कोटी रुपये झालीये, अशी माहिती कंपनीनं दिली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक