शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार बघायला मिळतो. यातच, आज (सोमवारी) सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये बीएसईवर 7.4% ची वाढ दिसून आली. याच बरोबर, कंपनीचा शेअर 15.05 रुपये या 52 आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तब्बल 12.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीच्या शेअरची स्थिती -वार्षिक आधारावर, सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एका वर्षाच्या कालावधित या शेअरमध्ये तब्बल 97 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार करता, या शेअरमध्ये 78 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. खरे तर, आपल्या 375 रुपये या उच्चांकी पातळीचा विचार करता, हा शेअर अजूनही 96% खालीच आहे.
काय म्हणतात एक्सपर्ट -यासंदर्भात बोलताना, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स म्हणाले, "सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समधील तेजी आणि ऑसिलेटर्सची ओव्हरसोल्ड स्थिती पाहता गुंतवणूकदारांनी काउंटरवर नफा मिळवायला हवा.'' गेल्या आठवड्यात सोमवारी कंपनीने घोषणा केली की, त्यांनी जगभरात स्थापित पवन टर्बाइन क्षमतेचा टप्पा गाठला आहे. एका नियामक फायलिंगमध्ये कंपनी म्हणाली, "सुझलॉन ग्रुपने सहा खंडांमध्ये पसरलेल्या 17 देशांतील 12,467 पवन टर्बाइन्सच्या माध्यमाने 20GW पवन ऊर्जेचा मैलाचा दगड पार केला आहे. यामुळे, जागतिक पवन ऊर्जेच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून सुझलॉनची स्थिती बळकट झाली आहे."
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)