Join us

एनर्जी सेक्टरमधील 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! एका दिवसात ७% घसरला, ऑल टाइम हायवरुन ५५ रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 2:05 PM

suzlon energy share : ऊर्जा क्षेत्रातील शेअर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच बुधवारी मोठी घसरण नोंदवली जात आहे. स्टॉक मागील बंद किंमतीपेक्षा ७ टक्क्यांनी घसरला आहे.

suzlon energy share : गेल्या महिन्यात शेअर बाजाराच्या घसरणीतही एका शेअरने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात गुंतवणूकदारही मालामाल झाले. पण, ही घोडदौड जास्त दिवस चालली नाही. बाजाराच्या त्सुनामीत हा शेअरही आला आणि जोरदार आपटला. मंगळवारी ट्रेडिंगच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. त्यानंतर दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. बुधवारीही शेअर बाजारात दबाव कायम आहे. दुपारी दीडच्या सुमारास सेन्सेक्स ४८० अंकांपेक्षा अधिक घसरून ७८,१९० वर व्यवहार करत होता, तर निफ्टी १७६ अंकांनी घसरून २३,७०७ वर व्यवहार करत होता. अशा स्थितीत दोन्ही निर्देशांकांवर प्रचंड दबाव असल्याने अनेक शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे. यात ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध स्टॉक सुझलॉन एनर्जीही सुटला नाही.

७ टक्के घसरणबुधवारी, सुझलॉन एनर्जीचे शेअर्स त्यांच्या मागील बंद किमतीच्या तुलनेत जवळपास ७ टक्क्यांनी घसरून ५५.०५ रुपयांवर आले. गेल्या ५ दिवसांत या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे, तर एका महिन्याच्या कालावधीत २५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सुझलॉनच्या शेअर्समध्ये महिनाभराहून अधिक काळ झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं टेंशन वाढलं आहे.

ऑल टाइम हायवरुन ३७ टक्क्यांनी घसरलाया शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ८६.०४ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३३.९० रुपये आहे. त्याचा नफा-ते-कमाई (P/E) गुणोत्तर ७८.१६ आहे. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे तर ते ७५.४८ हजार कोटी रुपये आहे. हा शेअर्स त्याच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा ३७ टक्क्यांनी खाली ट्रेडिंग करत आहे.

एक वर्षात ४२ टक्के नफासुझलॉन एनर्जी गुंतवणुकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या शेअरने गेल्या काही महिन्यांत चांगला परतावा दिला आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी गेल्या ६ महिन्यांत ४४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर एका वर्षाच्या कालावधीत ४२ टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक