Suzlon Energy Share: सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सवर गेल्या काही काळापासून दबाव आहे. गेल्या महिन्याभरात हा शेअर जवळपास १५ टक्क्यांनी घसरलाय. अनेक ब्रोकरेज कंपन्या या शेअरवर बुलिश दिसत आहेत. मात्र, व्हेंचुरा सिक्युरिटीजने हा शेअर विकण्याचा सल्ला दिलाय. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार सुझलॉन एनर्जी हा एक चांगला व्यवसाय आहे, परंतु त्याचं मूल्य फारसं चांगलं नाही. ब्रोकरेज कंपनीनं पुढील २४ महिन्यांसाठी शेअरसाठी ५० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलंय. ३० ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर १.०७ टक्क्यांनी घसरला असून बीएसईवर हा शेअर ६८.१५ रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने ११६ टक्के परतावा दिला आहे.
हे ब्रोकरेज बुलिश
दुसरीकडे, इतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांना सुझलॉनच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. जेएम फायनान्शिअलने पुढील १२ महिन्यांसाठी सुझलॉन एनर्जीवर ८१ रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. याशिवाय नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं पुढील १२ महिन्यांसाठी ६७ रुपयांची टार्गेट प्राइस ठेवलीये.
"आम्ही ५० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह विकण्याची शिफारस करच आहोत. हे सध्याच्या किंमतीपेक्षा २७.५ टक्क्यांनी कमी आहे. सुझलॉनची लिडिंग मार्केट पोझिशन, नुकत्याच झालेल्या रिकव्हरीनंतरही कॅश फ्लो जनरेशनल, एक्झिक्युशन आणि ओव्हरव्हॅल्युएशनशी संबंधिक जोखमी पुरेशा प्रतिबिबिंत होत नाही" असं नुवामानं म्हटलं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)