Lokmat Money >शेअर बाजार > Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

Suzlon Energy share price: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:53 PM2024-10-03T15:53:44+5:302024-10-03T15:55:56+5:30

Suzlon Energy share price: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Suzlon Energy shares fall 5 percent Action warning given by NSE and BSE details iran isreal tension affect | Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

Suzlon Energy share price: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ७५.७५ रुपयांवर आला. नुकतंच एनएससी आणि बीएसईनं सुझलॉन एनर्जीला वॉर्निंग लेटर दिलं होतं. दुसरीकडे शेअर्समध्ये घसरणीचं कारण मिडल इस्टमधील वाढता तणावही आहे. या वृत्तांदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. या घसरणीनंतर कंपनीचं मार्केट कॅप घसरून १.०३ कोटी रुपयांवर आलंय.

नोटीसमध्ये काय म्हटलंय?

कंपनीनं स्वतंत्र संचालक मार्क डेसेडेलियर यांच्या राजीनाम्याबद्दल आणि जूनमध्ये झालेल्या विश्लेषकांच्या कॉलबद्दल एक्स्चेंजला वेळेवर माहिती दिली नाही. 'मावळत्या स्वतंत्र संचालकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कंपनीकडून मिळालेली उत्तरे आणि कागदपत्रांचा आढावा घेतला असता असं आढळलं की, कंपनीकडून कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या चांगल्या पद्धतींचे पालन करता आले असतं,' असं एक्स्चेंजनं नोटीसमध्ये म्हटलंय.

एक्सचेंजने आपल्या नोटीसमध्ये सुझलॉनने ९ जून २०२४ रोजी केलेल्या विश्लेषक आणि गुंतवणूकदार कॉलसंदर्भातील नियमांचे पालन न केल्याचा उल्लेख केला आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांनी अशा घटनांची माहिती किमान कामकाजाच्या दोन दिवस अगोदर शेअर बाजाराला द्यावी. परंतु संचालकांच्या राजीनाम्यानंतर चिंता दूर करण्यासाठी कंपनीने अल्पावधीतच हा कॉल नियोजित केला. दरम्यान, या मुद्द्यांचा कंपनीच्या आर्थिक किंवा कामकाजावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, अशी ग्वाही सुझलॉनने दिली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Suzlon Energy shares fall 5 percent Action warning given by NSE and BSE details iran isreal tension affect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.