Lokmat Money >शेअर बाजार > 'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक

'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक

​​शेअर्समध्ये सलग पाचव्या सेशनमध्ये घसरण दिसून आली. कंपनीच्या शेअर्सला सातत्यानं 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:41 PM2024-03-06T15:41:46+5:302024-03-06T15:49:16+5:30

​​शेअर्समध्ये सलग पाचव्या सेशनमध्ये घसरण दिसून आली. कंपनीच्या शेअर्सला सातत्यानं 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे.

Suzlon Energy shares Gained First Now loss to investor Lower circuit The stock down on rs 38 | 'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक

'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक

Suzlon Energy shares : सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्समध्ये सलग पाचव्या सेशनमध्ये घसरण दिसून आली. कंपनीच्या शेअर्सला सातत्यानं 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्सनं इंट्राडे नीचांकी 38.53 रुपयांवर पोहोचले होते. यासह, सुझलॉन एनर्जीचा स्टॉक 2 फेब्रुवारी रोजी 50.72 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावरून 25 टक्क्यांनी खाली आला आहे. 5 दिवसांत स्टॉक 15 टक्क्यांनी घसरलाय. शेअर्सच्या या घसरणीमागे मोठं कारण आहे. खरं तर, विंड एनर्जी कॅपॅसिटीसाठी सरकार पुन्हा "रिव्हर्स ऑक्शन" आणण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. 
 

न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयानं (MNRE) एनर्जी कंपन्यांसाठी विंड एनर्जी कॅपॅसिटीचा लिलाव करण्यासाठी "रिव्हर्स ऑक्शन" परत आणण्याचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, मंत्रालयानं NTPC, NHPC, SJVN आणि इतर PSU सारख्या कंपन्यांना एक पत्र पाठवून निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये विंड बोलींमध्ये अंडरसबस्क्रिप्शन आधिक टॅरिफचा हवाला दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, MNRE नं प्लेन व्हॅनिला विंड टेंडरसाठी साईज 600 MW पर्यंत मर्यादित केली आहे आणि रिन्यूएबल एनर्जीची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींद्वारे संपूर्ण भारत आधारित बोली जारी करणे अनिवार्य केलं आहे. 
 

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?
 

जेएम फायनान्शियलने सुझलॉनवर आपले बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. ब्रोकरेजनं सुझलॉन एनर्जी शेअर्सवर 54 रुपयांचं टार्गेट ठेवलंय आणि खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. सुझलॉनच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांत 62 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, हा शेअर एका वर्षात 350 टक्क्यांनी वाढलाय. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Suzlon Energy shares Gained First Now loss to investor Lower circuit The stock down on rs 38

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.