Join us

'या' कंपनीच्या शेअरनं गाठला १४ वर्षांचा उच्चांकी स्तर; २ रुपयांवरुन गेला पोहोचला ८० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 2:57 PM

Suzlon Energy Share: या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या वरच्या स्तरावर ८०.४० रुपयांवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून शेअरला अपर सर्किट लागत आहे.

Suzlon Energy Share: सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या वरच्या स्तरावर ८०.४० रुपयांवर पोहोचला. सुझलॉन एनर्जीचे शेअर्स जानेवारी २०१० नंतरच्या उच्चांकी पातळीवर आहेत. सलग चौथ्या दिवशी सुझलॉन एनर्जीच्या शेअरला अपर सर्किट लागलं. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १९.३० रुपये आहे.

३ महिन्यांमध्ये १०० टक्क्यांची वाढ

गेल्या ३ महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ मे २०२४ रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर ३९.६० रुपयांवर होता. १२ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ८०.४० रुपयांवर पोहोचला. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये १०३ टक्के वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅपही वाढून १०९६२० कोटी रुपये झालं आहे.

२ रुपयांपर्यंत आलेला भाव

कंपनीचे शेअर्स २ रुपयांपर्यंत घसरले, सुझलॉन एनर्जीनं २००५ च्या अखेरीस शेअर बाजारात एन्ट्री केली. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५०० रुपये होती. सुझलॉन एनर्जीचा शेअर ३ एप्रिल २०२० रोजी २.०२ रुपयांपर्यंत घसरला होता. ही पातळी गाठल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर १२ ऑगस्ट २०२४ रोजी ८०.४० रुपयांवर पोहोचला आहे. ४ वर्ष ४ महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये ३८८०% वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक