Join us  

घसरणीनंतर आता पुन्हा Suzlon Energy च्या शेअर्सना अपर सर्किट, १ वर्षात दिला ४००% रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 3:16 PM

सुझलॉन एनर्जीच्या शेअरला गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये लोअर सर्किट लागलं होतं.

Suzlon Energy Share Price: देशातील आघाडीची पवनऊर्जा कंपनी सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरचं हसू गुरुवारी पुन्हा परतलं. सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गुरुवारी तेजी दिसून आली. गुरुवारी बाजार उघडताच सुझलॉन एनर्जीच्या शेअर लोअर सर्किट लागलं. परंतु अवघ्या 11 मिनिटांत स्टॉकनं अप्पर सर्किटचा टप्पा गाठला. याआधी, सुझलॉन एनर्जीच्या शेअरला गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये लोअर सर्किट लागलं होतं. त्यापूर्वी या शेअरमध्ये सातत्यानं मोठी वाढ दिसून आली होती. अलीकडेच कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे (Q2FY24) निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये कंपनीनं 102 कोटी रुपयांचा नफा कमावल्याची माहिती समोर आली होती.6 महिन्यात 315 टक्के रिटर्नसुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर ठरले आहेत. गेल्या एका वर्षात 396 टक्के परतावा मिळाला आहे. मागील 6 महिन्यांत शेअरनं 315 टक्के परतावा दिलाय. बुधवारी कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर 37.35 वर बंद झाला. 23 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचे मार्केट कॅप बीएसईवर सुमारे 53,187 कोटी रुपयांवर पोहोचले. 2023 मध्ये आतापर्यंत स्टॉक 266 टक्क्यांनी वाढला आहे.नफा वाढलाकंपनीनं दुसऱ्या तिमाहीत 102.29 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 56.47 कोटी रुपये होता. या तिमाहीत 34.99 कोटी रुपयांचा अनपेक्षित तोटा होऊनही कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1417 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 1430 कोटी रुपये होता. कंपनीचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) 32.6 टक्क्यांनी वाढून 225 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी तो 169.7 कोटी रुपये होते. त्याच वेळी, EBITDA मार्जिन 11.9 टक्क्यांवरून 15.9 टक्के झाले आहे.डेट फ्री कंपनीसुझलॉनची बॅलन्स शीट आता कर्जमुक्त झाली आहे. कंपनी मॅनेजमेंटच्या मते, सध्याच्या विंड टर्बाइनच्या पोर्टफोलिओसाठी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे सध्याचे ऑर्डर बुक 1613 मेगावॅट आहे. आर्थिक वर्षाच्या उर्वरित तिमाहीसाठी, कंपनीचं लक्ष ऑर्डर बुकच्या एक्झिक्युशनवर आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक