Lokmat Money >शेअर बाजार > Suzlonच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी, तारण ठेवलेले ९७ कोटी शेअर्स सोडवले; ६ महिन्यांत २५९ टक्के वाढ

Suzlonच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी, तारण ठेवलेले ९७ कोटी शेअर्स सोडवले; ६ महिन्यांत २५९ टक्के वाढ

विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 01:00 PM2023-10-05T13:00:07+5:302023-10-05T13:00:22+5:30

विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे.

Suzlon shares rocket speed redeem 97 crore pledged shares 259 percent growth in 6 months know details | Suzlonच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी, तारण ठेवलेले ९७ कोटी शेअर्स सोडवले; ६ महिन्यांत २५९ टक्के वाढ

Suzlonच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी, तारण ठेवलेले ९७ कोटी शेअर्स सोडवले; ६ महिन्यांत २५९ टक्के वाढ

विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर बुधवारी 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 28.28 रुपयांवर बंद झाले. तर गुरुवारी कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स 29.45 रुपयांवर व्यवहार करत होते. गुरुवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका मोठ्या बातमीमुळे होत आहे. दरम्यान, कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांच्या तारण ठेवलेले काही शेअर्स सोडवल्याची माहिती समोर आली आहे.

97.1 कोटी शेअर्स सोडवले
सुझलॉन एनर्जीच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेले 97.1 कोटी शेअर्स सोडवले आहेत. कंपनीने SBICAP ट्रस्टी कंपनी लिमिटेडकडून हे तारण ठेवलेले शेअर्स सोडवले आहेत. प्रवर्तकांनी सोडवलेले शेअर्स एकूण इक्विटीच्या 7.1 टक्के आहेत. तारण ठेवलेले शेअर्स 28 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज करण्यात आले आहेत. कंपनीनं 14 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांकडे कंपनीत 13.3 टक्के हिस्सा आहे, जे सुमारे 180 कोटी शेअर्स इतके आहे. या स्टेकपैकी सुमारे 81 टक्के किंवा 146 कोटी शेअर्स तारण ठेवण्यात आले होते.

6 महिन्यांत 259 टक्क्यांची वाढ
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 259 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2023 रोजी 8.12 रुपयांवर होते, जे 5 ऑक्टोबर 2023 रोजी 29.41 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विंड एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 5 दिवसात सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 29.41 रुपये आहे. त्याच वेळी, सुझलॉन एनर्जी शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 6.60 रुपये आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Suzlon shares rocket speed redeem 97 crore pledged shares 259 percent growth in 6 months know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.