Swan Energy Share Price: स्वान एनर्जी लिमिटेडचा शेअर मंगळवारी एनएसईवर 20 टक्क्यांनी घसरून 535.90 रुपयांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ही घट असूनही, गेल्या सहा महिन्यांत स्वान एनर्जीच्या शेअरची किंमती 90 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. दरम्यान, शेअर मार्केट अॅनालिस्ट याबाबत बेयरिश आहेत आणि त्यांनी दैनंदिन काऊंटर विक दिसत असल्याचं म्हटलं. परंतु बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजादरम्यान 4.76 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 572 रुपयांवर पोहोचला होता.
स्वान एनर्जीचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 27 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या एक महिन्यापासून गुंतवणूकदारांचे नुकसान होत असलेल्या या शेअरने यापूर्वी मात्र चांगला परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं 90 टक्के आणि गेल्या 5 वर्षांत 426 टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर त्यात जवळपास साडेतीन पटीनं वाढ झालीये. 12 मार्च 2021 रोजी तो 143.45 रुपयांवर होता आणि आता तो 535.90 रुपयांवर आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
डेली चार्टवर स्टॉक विक दिसत आहे आणि 520 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरलाय, असं डीआरएस फिनवेस्टचे संस्थापक रवि सिंह म्हणाले. टिप्स2ट्रेड्सचे एआर रामचंद्रन म्हणाले की 551 रुपयांच्या सपोर्टच्या खाली बंद झाल्यानं येत्या काळात शेअर 495 रुपयांपर्यंत घसरू शकतो.
"सपोर्ट 550 रुपयांवर असेल आणि रेझिस्टंट 616 रुपये असेल. 616 रुपयांच्या पातळीवर बंद झाला, तर तो 640 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एका महिन्यासाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज 500 आणि 640 रुपयांदरम्यान असेल," अशी प्रतिक्रिया आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल म्हणाले.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)