Lokmat Money >शेअर बाजार > Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 293.30 रुपयांवर पोहोचली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 02:19 PM2024-04-18T14:19:05+5:302024-04-18T14:20:30+5:30

Talbros Automotive share: आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 293.30 रुपयांवर पोहोचली.

Talbros Automotive share rs 1000 crore order share price increased investors rush to buy | Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: ऑटो कंपोनंटशी संबंधित असलेल्या टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 293.30 रुपयांवर पोहोचली. 22 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरनं 347.75 रुपयांची पातळी गाठली होती. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा शेअर 86 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. याचा अर्थ या शेअरनं गेल्या 12 महिन्यांत 230% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

कंपनीला मिळाल्या ऑर्डर
 

टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्सच्या (Talbros Automotive Components) जॉईंट व्हेन्चरला एका मोठ्या युरोपीय ओईएमकडून (OEM) सुमारे ₹1,000 कोटी किमतीचं कंत्राट मिळालं आहे. या जॉईंट व्हेन्चरचं नाव मरेली टॅल्ब्रोस चेसिस सिस्टम्स प्रा. लि. असं आहे. या ऑर्डरचा कालावधी आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीपासून 8 वर्षांसाठी आहे. या अंतर्गत मरेली टॅल्ब्रोस चेसिस सिस्टीम्सच्या पुणे प्लांटमधून उत्पादन केलं जाईल. यासाठी आर्थिक वर्षात ₹65 कोटी खर्च अपेक्षित आहे. अंतर्गत स्रोत आणि कर्जाच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. या ऑर्डरद्वारे कंपनीला युरोपमध्ये मजबूत स्थान मिळेल.
 

गेल्या वर्षी कंपनीला स्टँडअलोन आणि जॉईंट व्हेन्चर कंपनीच्या विविध उत्पादन श्रेणींमध्ये 980 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. यापैकी, ₹475 कोटी किमतीच्या ऑर्डर ईव्ही सेगमेंटच्या पुरवठ्यासाठी होत्या आणि ₹415 कोटी किमतीच्या ऑर्डर निर्यातीशी संबंधित होत्या.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Talbros Automotive share rs 1000 crore order share price increased investors rush to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.