Join us

'या' स्मॉल कॅप शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ५ दिवसांत प्रत्येक शेअरवर मिळाला ₹४०००चा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 4:29 PM

दिवसभरातील अस्थिरतेनंतर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. यामध्ये अनेक शेअर्सना अपर सर्किट लागलं. मात्र एक असा शेअर आहे ज्यानं ५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रत्येक शेअरवर ४ हजारांचा नफा मिळवून दिलाय.

दिवसभरातील अस्थिरतेनंतर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्सचा भारतीय बाजारातील या तेजीमध्ये मोठा वाटा आहे. कामकाजादरम्यान, अनेक शेअर्सना अपर सर्किट देखील लागलं. आम्ही तुम्हाला एका स्मॉल कॅप शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्यानं गेल्या ५ ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास ४५ टक्के नफा दिलाय, तर आजच्या ट्रेडिंगमध्ये त्याच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

५ दिवसात ४५ टक्के परतावा

१४ ऑगस्टला हा शेअर ९,८७४ रुपयांवर ट्रेड करत होता, जो २१ ऑगस्टला १४,२७३ रुपयांवर पोहोचला. अवघ्या पाच दिवसात हा शेअर ४३ टक्क्यांनी वधारला. तर, आजच्या व्यवसायात त्यात सुमारे १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी मंगळवारी टेस्टी बाइट ईटेबल्समध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली होती. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १८,३९९.८५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ९,१०० रुपये आहे. कामकाजाच्या अखेरिस या शेअरमध्ये १०.२७ टक्क्यांची वाढ होऊन तो १३,९४९ रुपयांवर पोहोचला. 

१ वर्षात २० टक्क्यांची घसरण

६ महिन्यांचे रिपोर्ट कार्ड पाहिलं तर या शेअरमध्ये फक्त ४ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर १ वर्षात जवळपास २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. २१ ऑगस्ट २०२३ रोजी हा शेअर १७,७२३ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता, जो वर्षभरानंतर २१ ऑगस्ट २०२४ रोजी १३,९४९ च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

टेक्टी बाइट इटेलेबल्स लिमिटेड तयार आणि फ्रोझन भाज्यांचं उत्पादन करते. टीबीईएलच्या प्रमुख उत्पादनांमध्ये सॉस आणि ग्रेव्ही, स्नॅक्स, नूडल्स, स्टीक, पॅटीस, नगेट्स यांचा समावेश आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक