Join us  

1000 पार जाणार टाटाचा हा शेअर! फिचनं वाढवली रेटिंग; जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 3:29 PM

ट्रेडिंगदरम्यान हा शेअर बीएसई इंडेक्सवर 1 टक्क्यांनी घसरून 953.85 रुपयांवर आला. मात्र असे असले तरी, हा शेअर वधारेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा केमिकल्सला (Tata Chemicals) फिच रेटिंग्सने गुड न्यूज दिली आहे. फिचने टाटा केमिकल्सच्या लॉन्ग-टर्म फॉरेन-करन्सी इश्यूअर डिफॉल्ट रेटिंगच्या (IDR) आउटलुकला स्टेबलवरून पॉझिटिव्ह केले आहे. या बरोबरच फिचने ‘बीबी+’ वर रेटिंगची पुष्टी केली आहे.

आज टाटा केमिकल्सचा शेअर निगेटिव्हमध्ये ट्रेड करताना दिसला. ट्रेडिंगदरम्यान हा शेअर बीएसई इंडेक्सवर 1 टक्क्यांनी घसरून 953.85 रुपयांवर आला. मात्र असे असले तरी, हा शेअर वधारेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. IIFL सिक्योरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट (कमोडिटी आणि करन्सी) अनुज गुप्ता यांनी या शेअरसाठी टार्गेट प्रासई देखील निश्चित केले आहे.

काय आहे टार्गेट प्राइस - अनुज गुप्ता म्हणाले, टाटा केमिकल्सचा शेअर 980 रुपयांच्यावर आहे. जर टाटा केमिकल्सच्या शेअरने लेवल पार केली तर तो 1010-1035 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

रेटिंग एजन्सीज काय म्हणतात - फिच रेटिंग्सने म्हटले आहे, टाटा समूहाच्या या कंपनीच्या फ्री कॅश फ्लो मार्जिनमध्ये सुधारणा होईल, अशी आशा आहे. फिचने म्हटले आहे, टाटा केमिकल्स अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करू शकते. एजन्सीच्या मते, टाटा केमिकल्सचा कॅश फ्लो अलिकडच्या वर्षांत संथ असल्याचे दिसत आहे.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक