टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. या शेअरमध्ये आज 5.93 टक्क्यांची घसरण दिसून आली. यानंतर कंपनीचा शेअर 1105.45 रुपयांवर आला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणने आहे.
2 दिवसांत 18% घसरला शेअर -
कंपनीचा शेअर गुरुवारी बीएसईवर 1349.70 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. मात्र, एक बातमी आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. कंपनीचा शेअर केवळ 2 दिवसांतच 18 टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा निचांक 922.20 रुपये आहे.
एक्सपर्ट्स म्हणतायत विकून टाका -
सीएनबीसी टीव्ही-18 च्या वृत्तानुसार, ब्रोकरेज फर्म कोटक इंस्टीट्यूशन इक्विटीने शेअरच्या विक्रीसंदर्भातील आपला सल्ला कायम ठेवला आहे. येणाऱ्या काळात कंपनीचा शेअर 780 रुपयांपर्यंत घसरू शकतो. अर्थात सध्याच्या शेअरप्राइसच्या तुलनेत 33 टक्क्यांपर्यंत हा शेअर घसरू शकतो. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी बाजार बंद होताना हा शेअर 1146.40 रुपयांवर होता.
या बातमीमुळे टाटा केमिकल्सचे गुंतवणूकदार निराश -
रिझव्र्ह बँकेच्या नियमांनुसार टाटा सन्सला पुढील काही वर्षांत आयपीओ लाँच करायचा होता. मात्र, टाटा सन्स टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या बातमीमुळे टाटा केमिकल्सचे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. टाटा केमिकल्सची टाटा सन्समध्ये 3 टक्के भागीदारी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)