Lokmat Money >शेअर बाजार > वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट

वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट

व्यवहाराट्या अखेरीस हा शेअर 0.44 टक्क्यांनी वाढून 5952.30 रुपयांवर बंद झाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:55 PM2023-03-30T14:55:27+5:302023-03-30T14:59:04+5:30

व्यवहाराट्या अखेरीस हा शेअर 0.44 टक्क्यांनी वाढून 5952.30 रुपयांवर बंद झाला...

tata elxsi will go to ₹7500 in a year Now it is available cheaply expert bullish | वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट

वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट

टाटा ग्रुपची कंपनी टाटा एलेक्सीच्या (Tata Elxsi) शेअरमध्ये बुधवारी तेजी दिसून आली. सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर, हा शेअर रिकव्हर झाला आहे. व्यवहाराट्या अखेरीस हा शेअर 0.44 टक्क्यांनी वाढून 5952.30 रुपयांवर बंद झाला. महत्वाचे म्हणजे आज रामनवमी असल्याने बाजार बंद आहे.

52 आठवड्यांतील निचांकापासून रिकव्हरी -
Tata Elxsi च्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांतील लो लेव्हलपासून 4.28 टक्क्यांची रिकव्हरी झाली आहे. हा शेअर आपल्या 52-आठवड्यांतील 10,760.40 रुपये या उच्चांकापासून 44.68 टक्क्यांनी कोसळला आहे. गेल्या वर्षात 17 ऑगस्टला हा शेअर या उच्चांकावर पोहोचला होता. आता एक्सपर्ट या शेअरसंदर्भात बुलिश असल्याचे दिसत आहे.

काय म्हणतायत एक्सपर्ट - 
शेअर इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट आणि रिसर्च हेड रवी सिंह म्हणाले, 'बेंचमार्क निर्देशांकातील रिकव्हरीमुळे शेअरच्या किमती घसरल्या आहेत. या आठवड्या हा स्टॉक 6,050 रुपयांवर पोहोचू शकतो. याच बरोबर, GCL चे CEO रवी सिंघल म्हणाले, कंपनीचे तिमाही निकाल चांगले आहेत परंतु स्टॉकचे P/E प्रमाण फारच अधिक आहे. दीर्घ मुदतीसाठी ही चांगली गुंतवणूक आहे. आम्ही पुढील एका वर्षात 7,500 रुपयांचे लॉन्ग टर्म टारगेट प्राइस ठेवण्याचा सल्ला देतो. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: tata elxsi will go to ₹7500 in a year Now it is available cheaply expert bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.