टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (IHCL) शेअरनं नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. इंडियन हॉटेल्सचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांनी वाढून 602.75 रुपयांवर पोहोचले. टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीच्या शेअर्सनं पहिल्यांदाच 600 रुपयांचा टप्पा ओलांडला. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे शेअर्स सलग 6 दिवसांपासून वाढत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, इंडियन हॉटेल्सचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
4 वर्षांत 800 टक्क्यांची वाढ
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या (IHCL) शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षात जवळपास 800 टक्क्यांची वाढ झाली आहे. 3 एप्रिल 2020 रोजी इंडियन हॉटेल्सचे शेअर्स 67.28 रुपयांवर होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी कामकाजादरम्यान टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीचे शेअर्स 602.75 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत, इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 400 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 26 फेब्रुवारी 2021 रोजी 119.10 रुपये होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 602.75 रुपयांवर पोहोचले आहेत.
वर्षभरात 100 टक्क्यांपर्यंत तेजी
27 मार्च 2023 रोजी टाटा समूहाच्या या हॉटेल कंपनीचे शेअर्स 304.80 रुपयांवर होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 602.75 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत इंडियन हॉटेल्सचे शेअर्स 50% पेक्षा जास्त वाढले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 401.10 रुपयांवरून 602.75 रुपयांपर्यंत वाढले आहेत. इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 300 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 602.75 रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)