जर तुम्ही शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी टाटा समुहाचा हा शेअर मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. इंडियन हॉटेलचे शेअर्स मंगळवारी इंट्राडेमध्ये 1% कमी होऊन 322.40 रुपयांवर होते.
इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड नव्या जोमाने व्यवसायात उतरण्यासाठी तयारी करत आहे. Ama Stays, Cumin, Chambers व्यवसाय उच्च मार्जिनसह वाढत आहेत, ROCE वाढत आहेत. FY25 पर्यंत नवीन व्यवसाय कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 26% योगदान देईल अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊसला FY22 मध्ये दिसलेली मजबूत मागणी FY23-25E मध्ये चालू राहणार असल्याचे बोलले जात आहे. इंडियन हॉटेलचे शेअरवर बाय रेटींग ठेवण्यात आले आहे.
Bank Locker Rules : 1 जानेवारीपासून बदलणार बँक लॉकरचे नियम, जाणून घ्या काय होणार बदल?
इंडियन हॉटेल शेअर्सवर 'बाय' रेटिंग आहे ज्याची लक्ष्य किंमत 390 रुपये आहे. भारतीय हॉटेल्सचे शेअर्स या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रति शेअर 348 रुपये या उच्चांकावर आहेत. टाटा समूहाचा समभाग यावर्षी 75% पेक्षा जास्त वाढला आहे.