Join us

५२ आठवड्यांच्या ऑल टाईम हायवर टाटा समुहाचा 'हा' शेअर, एका बातमीनं गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:19 PM

सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरनं बीएसईवर आपल्या ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला.

TCS Buyback: टाटा समूहाची दिग्गज कंपनी टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीत कंपनी आपले शेअर्स खरेदी करण्याचा विचार करेल. या एका बातमीनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS Share) शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरनं बीएसईवर आपल्या ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. यानंतर हा शेअर३६८० रुपयांवर पोहोचला.११ ऑक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत डिव्हिडंड देण्यावरही निर्णय घेतला जाऊ शकतो असं म्हटलं. जर डिव्हिडंडची घोषणा झाली तर रेकॉर्ड डेट १९ ऑक्टोबर २०२३ ही निश्चित केली जाऊ शकते. टीसीएसनं आतापर्यंत एका शेअरवर १०८ रुपयांचा डिव्हिडंड दिलाय. जर ११ ऑक्टोबरला पुन्हा घोषणा झाली तर या वर्षी टीसीएस पाचव्यांदा डिव्हिंडड देईल.शेअर्समध्ये तुफान तेजीसोमवारी टीसीएसचे शेअर्स बीएसईवर ३६५४ रुपयांवर खुले झाले. यानंतर काही वेळातच यात १.६ टक्क्यांची तेजी दिसून आली आणि ते ३६८० रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचले. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. जर वर्षाभरापूर्वी कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील, त्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत १७ टक्क्यांपेक्षा अधिक फायदा झालाय.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार