नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. घसरणीच्या धक्क्यातून सावरत शेअर बाजारात पुन्हा एकदा वधारल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराची स्थिती काही असली तर गुंतवणूकदारांना काही कंपन्या भन्नाट रिटर्न देताना पाहायला मिळत आहे. यात TATA Group अग्रेसर असल्याचे सांगितले जात आहे. टाटाच्या अनेक कंपन्यांनी कमाल कामगिरी करत गुंतवणूकादारांना उत्तम परतावा दिला आहे. यातील एक कंपनी म्हणजे TRF लिमिटेड.
टाटा समूहाचे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातील TRF लिमिटेड स्मॉलकॅप स्पेसच्या या शेअरने अवघ्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या समभागाने सलग ६व्या व्यापार सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. शेअरमध्ये सलग सहाव्या दिवशीही अप्पर सर्कीट लागले. NSE वर ३४०.५५ रुपयांच्या शेअरमध्ये ५ टक्के अप्पर सर्किट लागले.
केवळ ६ दिवसांत १ लाखाचे झाले २ लाख!
टीआरएफ लिमिटेडचा शेअर ३४०.५५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. १२ सप्टेंबर २०२२ रोजी या शेअरची किंमत १६८.८ रुपये होती. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना फक्त सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये १०१ टक्के परतावा मिळाला. म्हणजेच या शेअरमध्ये ६ दिवसांपूर्वी कोणी १ लाख रुपये गुंतवले असेल तर, त्याची किंमत आज २ लाखांपेक्षा जास्त झाली असती. याशिवाय, एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे १८५ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
दरम्यान, TRF लिमिटेड बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटसाठी विविध इलेक्ट्रोमेकॅनिकल कार्ये करते. ते पायाभूत संरचना आणि फॅब्रिकेशन, जीवन सायकल सेवा आणि संबंधित सेवांमध्ये देखील सामील आहे. या कंपनीची स्थापना २० नोव्हेंबर १९६२ रोजी झाली. हे टाटा स्टील आणि एसीसी लिमिटेड ही एक प्रकारे टाटा समूहाची कंपनी आहे. गेल्या पाच दशकांपासून कंपनी टाटा स्टील, टाटा पॉवर, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, सेल, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, कृष्णपट्टणम पोर्ट यांसारख्या कंपन्यांना मूल्यवर्धित उत्पादने आणि सेवा पुरवत आहे.