Lokmat Money >शेअर बाजार > टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह?

टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह?

Tata Group valuation : देशात सर्वाधिक रोजगार देण्यात टाटा समूह आघाडीवर आहे. टाटा समूहाची एकूण संपत्तीसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही कमजोर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:00 AM2024-10-10T10:00:13+5:302024-10-10T10:01:24+5:30

Tata Group valuation : देशात सर्वाधिक रोजगार देण्यात टाटा समूह आघाडीवर आहे. टाटा समूहाची एकूण संपत्तीसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही कमजोर आहे.

tata group provides employment to 10 lakh people valuation is more than pakistan | टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह?

टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह?

Tata Group valuation : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आज आपल्यात नाहीत. मात्र, त्यांनी देशाच्या प्रगतीत जे योगदान दिलंय ते कायम राहणार आहे. खाण्याच्या मिठापासून ते विमान कंपन्यांपर्यंत... टाटा समूहाचे शेकडो व्यवसाय आहेत. जर आपण टाटा समूहाच्या मार्केट कॅपबद्दल बोललो तर ते पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानचा जीडीपी या वर्षाच्या अखेरीस ३४७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर टाटा समूहाचे मार्केट कॅप जुलै २०२४ मध्येच ४०० अब्ज डॉलर पार केले होते. टाटा समूह हा देशातील पहिला व्यवसाय समूह आहे, ज्यांचे एकत्रित मूल्यांकन ४०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. टाटा समूहाच्या साम्राज्यात १०० हून अधिक कंपन्या आहेत. समुहाच्या २६ कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहेत.

१८६८ साली टाटा समूहाची मुहूर्तमेढ
टाटा समूह हे सर्वात जुने उद्योगपती घराणे आहे. १८६८ मध्ये ट्रेडिंग कंपनी म्हणून या समूहाची सुरुवात झाली. टाटा समूहात जवळपास १०० कंपन्यांचा समावेश आहे. टाटा समूह इतका मोठा आहे की त्याचा व्यवसाय ६ खंडांमधील १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. तर टाटा समूहाची उत्पादने जगातील १५० देशांमध्ये वापरली जातात.

टाटा ग्रुपच्या कंपन्या
टाटा समूहाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन कंपनी, टाटा केमिकल, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स कंपनी, टाटा ग्राहक उत्पादने, टाटा कम्युनिकेशन, व्होल्टास लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मेटालिक्स, टाटा एलएक्ससी नेल्को लिमिटेड, टाटा टेक आणि रॅलिस इंडियाचा समावेश आहे.

10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार
टाटा समूह देशात मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देत आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या आकडेवारीनुसार, जगभरातील टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १०,२८,००० होती. एकट्या टाटा समूहाच्या TCS मध्ये सुमारे ६,१५,००० लोक काम करतात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत टीसीएस जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

वर्षभरात टाटांच्या या कंपन्यांची कमाल
गेल्या वर्षभरात टाटा मोटर्स आणि ट्रेंटच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे टाटा समूहाचं मूल्यांकन वाढलं. गेल्या वर्षी दशकभरानंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ आला होता. ज्यानं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. टाटा टेक्नॉलॉजीज व्यतिरिक्त, टीआरएफ, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटो मोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्स्टन इंजिनिअरिंग यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 

Web Title: tata group provides employment to 10 lakh people valuation is more than pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.