Tata Group Stock: टाटा समूहाची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) 2023 मध्ये बेंचमार्क निर्देशांक निफ्टीमध्ये सर्वोच्च कामगिरी केल्यानंतर 2024 मध्ये आणखी मोठी झेप घेण्यास तयार आहे. मजबूत आऊटलूकमुळे, ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. ब्रोकरेजने हे अपग्रेड अपेक्षेपेक्षा चांगल्या मार्जिन प्रॉस्पेक्ट्स आणि जेएलआरमध्ये (JLR) फ्री कॅश फ्लो (FCF) डिलिव्हरीमुळे केलं आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या या शेअरचा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही समावेश आहे.
₹925 पर्यंत पोहोचणार
जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सचं रेटिंग 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट' असं केलं आहे. तसंच, त्याची टार्गेट प्राईज 680 रुपयांवरून 925 रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. 3 जानेवारी 2024 रोजी शेअरची किंमत 781 रुपयांवर बंद झाली. अशाप्रकारे, स्टॉक सध्याच्या किंमतीपासून सुमारे 18-19 टक्के मजबूत परतावा देऊ शकतो. जर आपण टाटा मोटर्सच्या 2023 मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या शेअरनं बेंचमार्क निर्देशांक निफ्टीमध्ये सर्वोच्च कामगिरी केली. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे.
ब्रोकरेजचं मत काय?
जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार जेएलआरमध्ये अपेक्षेपेक्षा चांगलं मार्जिन असण्याची शक्यता आहे. कंपनीकडे फ्री कॅश फ्लो असेल. स्टॉकमध्ये सुधारणा होण्याचे मुख्य कारण जेएलआरचे मार्जिन मजबूत करणं हे आहे. ग्लोबल लक्झरी OEMs जेएलआरचं लक्ष व्हॉल्युमपेक्षा नफ्यावर आहे.
दुसरीकडे, भारतात कंपनीचा मार्केट शेअर मजबूत आहे. स्पर्धक कंपन्यांनी नवे प्रोडक्ट लाँच केले असले तरी कंपनीची विक्री मजबूत आहे. स्टॉक अपग्रेडमध्ये बॅलन्स शीट डिलिव्हरेजिंग मोठी भूमिका बजावते. बॅलन्स शीट डिलिवरेजिंगमधून EPS वॉलेटिलिटी कमी झाली पाहिजे आणि यामुळे री-रेटिंगची अपेक्षा आहे. ब्रोकरेजनं FY25-26 मध्ये ईपीएसमध्ये 20-30 टक्क्यांनी वाढ केली आहे.
(टीप - यामध्ये देण्यात आलेली मतं ब्रोकरेज हाऊसची आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
₹९२५ पर्यंत जाऊ शकतो Tata Group चा 'हा' दिग्गज शेअर, ब्रोकरेजनं अपग्रेड केलं रेटिंग
या शेअरनं एका वर्षात केलेत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:23 AM2024-01-04T11:23:32+5:302024-01-04T11:24:01+5:30