Join us  

Trent Ltd Share : Tata Group चा 'हा' स्टॉक थांबण्याचं नावच घेत नाही, पोझिशनल गुंतवणूकदार कोट्यधीश; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:56 AM

Trent Ltd Share : गेल्या वर्षभरात एका टाटा समूहाच्या (Tata Group) एका कंपनीनं चांगला परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात बीएसई १०० निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरला आहे.

गेल्या वर्षभरात एका टाटा समूहाच्या (Tata Group) एका कंपनीनं चांगला परतावा दिला आहे आणि ती म्हणजे ट्रेंट लिमिटेड (Trent Ltd). कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात बीएसई १०० निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरला आहे. अवघ्या वर्षभरात टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाली आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी २ वर्षे हा शेअर ठेवला आहे त्यांना आतापर्यंत १४०० टक्के परतावा मिळालाय.

अवघ्या १० वर्षांत या कंपनीने काही पोझिशनल गुंतवणूकदारांना कोट्यधीशही बनवलंय. ट्रेंट या कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊ.ट्रेंटच्या शेअरची किंमत ५ वर्षात १४०० टक्के आणि १० वर्षात ६२०० टक्क्यांनी वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी कंपनीत दोन लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार आतापर्यंत होल्डिंगवर कोट्यधीश झाले आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर जवळपास १ टक्क्यांनी घसरून ७१६७.९५ रुपयांवर बंद झाला.

कंपनी काय करते?

ही कंपनी रिटेल क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये वेस्टसाइड, झुडिओ आणि स्टार सारखे ब्रँड आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली आहे. या कालावधीत ट्रेंटच्या महसुलात वार्षिक आधारावर ५६.१६ टक्के वाढ झाली आहे. तर, नफ्यात १२६.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिमाही निकालानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसेस या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ट्रेंटचा महसूल ३७९.६० कोटी रुपये होता. जो यावेळी ४०३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला ८४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर आता ३४२.२० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 

झपाट्यानं होतोय विस्तार

कंपनीचा विस्तारही झपाट्यानं होत आहे. वेस्टसाइड स्टोअर्सची संख्या २२८ वर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, झुडिओ स्टोअर्सची संख्या ५५९ आणि स्टार स्टोअर्सची संख्या ७२ झाली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूक