Lokmat Money >शेअर बाजार > TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट

TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट

TATA च्या  शेअरमध्ये गुरुवारी 1 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्या दिवसापासून मागच्या तीन दिवसात शेअरमध्ये तेजीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले, आता टाटा कंपनीला कर्नाटकमध्ये एक मोठे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:11 PM2022-12-29T13:11:14+5:302022-12-29T13:16:40+5:30

TATA च्या  शेअरमध्ये गुरुवारी 1 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्या दिवसापासून मागच्या तीन दिवसात शेअरमध्ये तेजीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले, आता टाटा कंपनीला कर्नाटकमध्ये एक मोठे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे.

tata group share tata power break 3 days surging after big contract win | TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट

TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट

  TATA च्या  शेअरमध्ये गुरुवारी 1 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्या दिवसापासून मागच्या तीन दिवसात शेअरमध्ये तेजीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले, आता टाटा कंपनीला कर्नाटकमध्ये एक मोठे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला टाटा पॉवर डीडीएलकडून कर्नाटकमध्ये 225 मेगावॅटचा हायब्रीड पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी कॉन्ट्रक्ट मिळाले आहे. हायब्रीड प्रकल्पांतर्गत सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प एकत्र बसवले जाणार आहेत.

टाटा कंपनीने या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आङे. या निवेदनात म्हटले आहे की, वीज खरेदी कराराच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडला वितरित केली जाईल. टाटा पॉवर DDL दिल्लीच्या उत्तर भागात वीज वितरण करते.

सुट्टीवर असलेल्या सहकाऱ्याला त्रास दिल्यास 1 लाख रुपयांचा दंड! 'या' कंपनीने बनवला नवा नियम

“टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि. (TPREL) ला टाटा पॉवर DDL कडून कर्नाटकातील हायब्रीड प्रकल्पासाठी प्रकल्प कॉन्ट्रक्ट पत्र मिळाले आहे.” TPREL ही टाटा पॉवरची उपकंपनी आहे. टाटा पॉवर डीडीएल ही टाटा पॉवर आणि दिल्ली सरकारची संयुक्त कंपनी आहे, अस टाटा पॉवरने म्हटले आहे. 

Web Title: tata group share tata power break 3 days surging after big contract win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.