TCS Share Target Price: टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) शेअर्स 27 फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान 1.76 टक्क्यांनी वाढून 4071.55 रुपयांवर व्यवहार करत होते. शेअरच्या वाढीचं कारण म्हणजे त्याचं अपग्रेडेड रेटिंग आणि जागतिक ब्रोकरेज UBS द्वारे त्याच्या टार्गेट प्राईजमध्ये करण्यात आलेली वाढ.
ब्रोकरेज फर्मनं रेटिंग न्यूट्रल वरून 'बाय' वर अपग्रेड केलं आहे. स्विस अॅनालिस्टनं स्टॉकवरील त्यांची टार्गेट प्राईज 4,000 रुपयांवरून 4,700 रुपयांपर्यंत म्हजेच 17.5% ने वाढवली आहे. दुसरीकडे, इतर ब्रोकरेज फर्मच्या 25 अॅनालिस्ट्स्नं टीसीएस खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकी 11 अॅनालिस्ट्सनं तो होल्ड करण्याचा सल्ला दिलाय, तर 11 अॅनालिस्टनं तो विकण्याचा सल्ला दिलाय.
टीसीएसकडून अपेक्षा
या स्विस फर्मला आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये टीसीएस कडून मोठ्या अपेक्षा आहेत. 100 ते 150 बेसिस पॉइंट्सच्या महसुलातील वाढीसोबतच मार्जिनच्या सुधारणेतही कंपनी आपल्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहील अशी त्यांचा अपेक्षा आहे. तसंच हा शेअर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत आपल्या लाँग टर्न ट्रेडिंगच्या प्रीमिअमच्या नीचांकी स्तरावर आहे.
कशी आहे आर्थिक स्थिती?
डिसेंबर 2023 तिमाहीत टीसीएसनं 60,583 कोटी रुपयांची कमाई नोंदवली आणि समायोजित आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 12,016 कोटी रुपये होता. कंपनीनं या कालावधीत 15,155 कोटी रुपयांचे ईबीआयटी अथवा व्याज आणि कर पूर्व उत्पन्न नोंदवलं, जे 4.6% अधिक होतं. त्याच वेळी, EBIT मार्जिन 70 बेसिस पॉइंट्सने वाढून 25% झालं.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यामध्ये देण्यात आलेली तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)