Join us  

TATA ग्रुपच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, कंपनीनं दिली ही खास अपडेट; गुंतवणुकदार झाले मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:37 PM

कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरद्सत तेजी दुसून आली आहे.

टाटा ग्रुपच्या (Tata Group Share) शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी दिसून येत आहे. जर आपल्याकडेही टायटनचे शेअर्स असतील (Titan Share Price) तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी दुसून आली आहे. आजच्या वाढीसह या शेअरची किंमत आता 2,727.00 वर ट्रेड करत आहे. 

18 टक्यांनी वाढला कंपनीचा शेअर -कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरद्सत तेजी दुसून आली आहे. टायटनने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत त्यांचा ओव्हऑल सेल वार्षीक दृष्ट्या 18 टक्क्यांनी वाढला आहे. तसेत, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने रिटेल नेटवर्कमध्ये 105 स्टोअर्स आणखी जोडले आहेत.

शेअर्समध्ये 5 वर्षांत 336 टक्क्यांची वाढ -13 ऑक्टोबर 2017 रोजी कंपनीचा शेअर 625 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या 5 वर्षांत कंपनीने तब्बल 336.39 टक्के परतावा दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरमध्ये 2,102.95 रुपयांची तेजी दिसून आली आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे 37.60 लाख रुपये झाले असते.

63,789.93 टक्क्यांचा परतावा - या शेअरच्या प्रॉफिटसंदर्भात बोलायचे झाल्यास 1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीचा शेअर 4 रुपयांवर होता. या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 63,789.93 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या 23 वर्षांत कंपनीचा शेअर 2,723.83 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजार