Tata Group Rekha Jhunjhunwala Portfolio:टाटा ग्रुपच्या दोन शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या काही दिवसांत या दोन शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाल्याचे सांगितले जात आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टाटाच्या एका कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आहे. दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाल यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टाटावरील विश्वास कायम ठेवत तब्बल १० लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
रेखा झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीतील हिस्सा ५.२९ टक्के (४,६९,४५,९७० इक्विटी समभाग) वाढला. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत त्यांची हिस्सेदारी ५.१७ टक्के (४,५८,९५,९७० इक्विटी शेअर्स) होती. जानेवारी-मार्च २०२३ या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीमध्ये सुमारे ०.१२ टक्के हिस्सा (१०.५० लाख इक्विटी) वाढवला आहे. हा स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळापासून आहे. होल्डिंग व्हॅल्यू सध्या १२,१३८.६ कोटी रुपये आहे. टायटन कंपनीची मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. टायटन हा देशातील दागिने आणि वेअरेबल विभागातील आघाडीचा ब्रँड आहे.
गेल्या ५ वर्षांमध्ये स्टॉकमध्ये १७० टक्क्यांहून अधिक परतावा
१३ एप्रिल २०२३ रोजी टायटनचा स्टॉक २,५८० रुपयांवर बंद झाला. तर, २० एप्रिल २०१८ रोजी शेअरची किंमत ९६५.५५ रुपये होती. अशा प्रकारे, गेल्या ५ वर्षांमध्ये स्टॉकमध्ये १७० टक्क्यांहून अधिक परतावा दिसून आला. म्हणजेच, जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे मूल्य २.७० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, रेखा यांच्याकडे टायटनचे ४,५८,९५,९७० आणि टाटा मोटर्सचे ५,२२,५६,००० शेअर आहेत.
दरम्यान, टायटनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ४,५८,९५,९७० शेअर म्हणजेच ५.१७ टक्के हिस्सेदारी होती. टायटनच्या शेअरची किंमत वाढली आणि यामुळे रेखा यांना २३० कोटींचा फायदा झाला.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"