Tata Group Stock To Buy:टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांचाही समावेश आहे. टाटा समूहाच्या टायटन कंपनीतून त्यांनी मोठी कमाई केली आहे. झुनझुनवालांच्या मृत्यूनंतर, त्यांचा पोर्टफोलियो पत्नी सांभाळत आहे. विशेष म्हणजे, टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीने झुनझुनवाला कुटुंबीयांना दमदार परतावा दिला आहे.
मुंबईतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे, ज्यामुळे क्षेत्रातील कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढताना दिसतोय. मॉर्गन स्टॅन्ले यांनी टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीवर विश्वास दाखवत शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) वरील आपल्या 'ओव्हरवेट' रेटिंगचा पुनरुच्चार केला आहे. ब्रोकरेजने IHCL स्टॉकची लक्ष्य किंमत देखील सेट केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने IHCL वर 856 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
आज हा स्टॉक ट्रेडिंग दरम्यान 3% ने वाढला आणि इंट्राडे हाय 779.10 रुपयांवर पोहोचला होता. याची मागील बंद किंमत 760.85 रुपये आहे. BSE वर दिलेल्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 1,42,87,765 शेअर्स आहेत, जे कंपनीचे 1% स्टेकच्या बरोबरीचे आहेत. याशिवाय, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत 1.2% हिस्सा, म्हणजेच 1,45,23,200 शेअर्स होते. अशारितीने झुनझुनवाला कुटुंबाकडे या कंपनीचे एकूण 28,810,965 शेअर्स(2.2%) हिस्सा आहे.
डिसेंबर तिमाही निकालIHCL चा कर नंतरचा नफा (PAT) 2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 28.8 टक्क्यांनी (YoY) वाढून 582.31 कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 451.95 कोटी रुपये होता. Q3 FY25 मध्ये महसूल रु. 2,533 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,964 कोटींवरून 29 टक्के वाढ दर्शवितो. ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीसाठी EBITDA वार्षिक आधारावर 31.3 टक्क्यांनी वाढून 961.68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो Q3FY24 मध्ये 732.38 कोटी रुपये होता.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)