टाटा समूहाच्या अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअर्सनी काही वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे, समूहाची रिटेल कंपनी असलेल्या ट्रेंट लिमिटेडचा. ट्रेंटच्या शेअरची किंमत गेल्या दहा वर्षांपूर्वी ₹98 एवढी होती. जी आता ₹1885 वर आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना एका दशकात 1825% एवढा जबरदस्त परतावा मिळाला आहे. आता ट्रेंट लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे जारी केले आहेत. या निकालानंतर, एक्सपर्ट देखील बुलिश दिसत आहेत.
जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा -चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ट्रेंट लिमिटेडचा निव्वळ नफा 45 टक्क्यांनी वाढून वार्षिक आधारावर 166.67 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 114.93 कोटी रुपये एवढा निव्वळ नफा झाला होता. ट्रेंट लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीमध्ये कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 2628.37 कोटी रुपयांवर पोहोचले. जे जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत 1803.15 कोटी रुपये होते. तिमाहीतील एकून खर्च वाढून 2495 कोटी रुपये झाला. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1734 कोटी रुपये होता.
काय म्हणताय एक्सपर्ट? -ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने शक्यता वर्तवली आहे की, येणाऱ्या तिमाहीत ट्रेंटची मजबूत विक्री सुरूच राहील. ब्रोकरेज ट्रेंटवर पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी ₹2000 प्रति शेअरच्या टार्गेट प्राइससह स्टॉकवर 'खरेदी' रेटिंग कायम ठेवली आहे. याच पद्धतीने सेंट्रम ब्रोकिंगनेही स्टॉकवरील 'खरेदी' रेटिंग आणि 2123 रुपयांच्या टार्गेट प्राईस सह आपला आउटलुक पॉझिटिव्ह ठेवला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)