Join us  

फक्त एका वर्षात 267% वाढ...टाटा समूहाच्या 'या' 13 शेअर्सनी केले मालामाल..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 3:48 PM

गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारात टाटा समूहाचा शेअर तेजीत आहे.

Tata Group Stocks : गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारातटाटा समूहाचा शेअर (Tata Group Stock) तेजीत आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सनी अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. हा परतावा 3.67 पटीपर्यंत आहे. म्हणजेच, एखाद्याने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर ती आता 3 लाख 67 हजार रुपयांची होईल.

टाटाच्या या शेअर्सनी पैसे केले दुप्पटटाटा समूहाच्या ट्रेंट, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, TRF लिमिटेड, व्होल्टास, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीज लिमिटेड, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि तेजस नेटवर्क लिमिटेड...म्हणजेच, एकूण सात शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. AceEquity डेटानुसार, Tata Power Company Ltd, Nelco Ltd, Tata Motors Ltd, The Indian Hotels Company Ltd आणि Rallis India Ltd यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 50 ते 100 टक्के परतावा दिला आहे.

या शेअर्सनी 267 टक्के परतावा दिलाआकडेवारीनुसार, ट्रेंट 26 ऑक्टोबर 2023 रोजी 1946.35 रुपयांच्या नीचांकावरून 267.23 टक्क्यांनी वाढून 7,147.75 रुपयांवर पोहोचला. टाटा ट्रेंट लवकरच निफ्टीत सामील होणार आहे. तर, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​शेअर्स सप्टेंबर 2023 मधील 2,438.05 रुपयांच्या नीचांकावरुन 196 टक्के वाढून 7,213.20 रुपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय, टाटा इन्व्हेस्टमेंटने गेल्या एका वर्षात 150 टक्क्यांनी झेप घेतली आहे. याच काळात व्होल्टास लिमिटेड 109 टक्क्यांनी वाढला आहे.

टाटा समूहातील ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीज लिमिटेड, ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड आणि तेजस नेटवर्क्स लिमिटेड 105 ते 118 टक्क्यांच्या दरम्यान वाढले. टाटा पॉवर कंपनी लिमिटेड 87 टक्के, नेल्को 85 टक्के आणि टाटा मोटर्स 80 टक्के वाढले आहेत. याशिवाय, इंडियन हॉटेल्स कंपनी 76 टक्के आणि रॅलिस इंडिया लिमिटेड 69 टक्के वाढले आहेत.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारटाटा