Share Market Investment Tips: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगातील घटनांचा भारतीय शेअर मार्केटवर नकारात्मक प्रभाव पडताना दिसत आहेत. मात्र, अशातच देशासह जगातील एक दिग्गज आणि विश्वासू ब्रँड मानल्या जाणाऱ्या टाटा ग्रूपच्या एक कंपनीने गुंतवणूकदारांना भलतेच मालामाल केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टाटा या कंपनीने कमाल कामगिरी केली असून, आता कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देऊ केला आहे.
IT उद्योगाशी निगडीत टाटा समूहाची कंपनी टाटा Elxsi ने गेल्या १० वर्षात गुंतवणूकदारांना ६ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. Tata Elxsiचे शेअर्स या काळात ९६ रुपयांवरून ६ हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. Tata Elxsi ने त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर दिले आहेत. Tata Elxsi शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी १०, ७६० रुपये होती. मात्र, आताच्या घडीला हा शेअर ६,०१५ रुपयांवर व्यवहार करत आहे.
गेल्या ३ वर्षांत शेअरने घेतली मोठी झेप
Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात चांगली कामगिरी केली आहे. २७ मार्च २०२० रोजी मुंबई शेअर बाजारात Tata Elxsiचे शेअर्स ६३९.८५ रुपयांवर होते. तर आता ३१ मार्च २०२३ रोजी टाटा ग्रुपचा हा शेअर ५,९६१.५० रुपयांवर बंद झाला होता. टाटा समूहाच्या समभागांनी गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना ८३१ टक्के परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने ३ वर्षांपूर्वी Tata Elxsi शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ते तसेच ठेवले असते तर आता त्याची किंमत ९.३१ लाख रुपये झाली असती.
कसे झाले १ लाखाचे १.२ कोटी?
१३ एप्रिल २०१३ रोजी मल्टिबॅगर यादीतील टाटा एलेक्सीचे शेअर्स ९६ रुपयांवर होते. त्या वेळी एखाद्या व्यक्तीने टाटा एलेक्सीचे शेअर्स १ लाख रुपयांना विकत घेतले असते, तर त्याला १०४१ शेअर्स मिळाले असते. Tata Elxsi ने १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले. म्हणजेच कंपनीने ठेवलेल्या प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर दिला आहे. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर एकूण शेअर्सची संख्या २०८२ झाली असती. Tata Elxsi चे शेअर ३१ मार्च २०२३ रोजी ५,९६१.५० रुपयांवर बंद झाले. अशा परिस्थितीत, या घडीला या कंपनीच्या शेअरची एकूण किंमत १.२ कोटी रुपये झाली असती, असे सांगितले जात आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"