Lokmat Money >शेअर बाजार > Tata ग्रुपच्या या शेअरनं 1 लाखाचे केले होते 40 लाख, आता करतोय कंगाल! गुंतवणूकदारांना मोठा फटका

Tata ग्रुपच्या या शेअरनं 1 लाखाचे केले होते 40 लाख, आता करतोय कंगाल! गुंतवणूकदारांना मोठा फटका

विशेषत: ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना मोठा फटका बसत आहे. या स्टॉकचे नाव आहे TTML.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:23 PM2022-12-05T16:23:40+5:302022-12-05T16:24:07+5:30

विशेषत: ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना मोठा फटका बसत आहे. या स्टॉकचे नाव आहे TTML.

tata group ttml share was made 1 lakh to 40 lakhs; now the doing poor to Investors | Tata ग्रुपच्या या शेअरनं 1 लाखाचे केले होते 40 लाख, आता करतोय कंगाल! गुंतवणूकदारांना मोठा फटका

Tata ग्रुपच्या या शेअरनं 1 लाखाचे केले होते 40 लाख, आता करतोय कंगाल! गुंतवणूकदारांना मोठा फटका

टाटा समूहाची एक कंपनी, जिचे फाउंडर स्वतः रतन टाटा आहेत, तिच्या स्टॉकने मागील तीन वर्षांत 1 लाख रुपयांचे तब्बल 40 लाख रुपये केले आहेत. मात्र, आता या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना कंगाल करायला सुरुवात केली आहे. विशेषत: ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना मोठा फटका बसत आहे. या स्टॉकचे नाव आहे TTML.

टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेडने (महाराष्ट्र) या वर्षात आतापर्यंत 53.47 टक्क्यांचा निगेटिव्ह परतावा दिला आहे. अर्थात कुणी 3 जानेवारी 2022 रोजी 216.65 रुपये प्रति शेअर दराने या स्टॉकमध्ये एक लाख रुपयांची  गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या एक लाख रुपयांचे आता 47000 रुपयांपेक्षाही कमी झाले असतील.

जानेवारी 2022 मध्ये हा स्टॉक आपल्या ऑल टाइम हाय लेव्हलला म्हणजेच ₹290.15 प्रति शेअरवर पोहोचला होता. मात्र यानंतर, हा स्टॉक दबावात आहे. पण असे असतानाही ज्या गुंतवणूकदारांनी थोडी वाट बघितली, त्यांना स्टॉकने चांगला परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत हा स्टॉक जवळपास ₹2.50 वरून ₹100 वर वाढला आहे. अर्थात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3,900 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

सहा माहिन्यातील परतावा - 
गेल्या सहा महिन्यांत, टाटा समूहाचा हा टेलिकॉम स्टॉक ₹122 वरून कोसळून ₹100.20 वर आला आहे. या काळात जवळपास 17 टक्क्यांहून अधिकची घसरण नोंदवली गेली आहे. या वर्षात या स्टॉकमध्ये 50 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: tata group ttml share was made 1 lakh to 40 lakhs; now the doing poor to Investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.