Join us  

Tata Group चा मल्टीबॅगर स्टॉक वेग पकडणार; 5 वर्षात दिला तब्बल 800% परतावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 3:07 PM

Tata Motors Share : ब्रोकरेज फर्मने या स्टॉकला बाय रेटिंग्स दिली आहे.

Tata Group Stock : मंगळवारी (27 ऑगस्ट) शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. यादरम्यान, जागतिक ब्रोकरेज जेपी मॉर्गनने (JP Morgan) टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्सची (Tata Motors) रिपोर्ट जारी केली. ब्रोकरेज टाटा मोटर्सच्या शेअर्सबाबत उत्साही असून, यात सुमारे 15 टक्के वाढीचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, दीर्घकाळात टाटा मोटर्समधील गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा मिळाला आहे.

₹1250 नवे टार्गेटजेपी मॉर्गनने टाटा मोटर्सचे 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, प्रति शेअर टार्गेट प्राइस 1250 रुपये ठेवली आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी शेअरची किंमत रु. 1092 वर बंद झाली होती. अशा प्रकारे, स्टॉकला सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 15 टक्के मजबूत परतावा मिळू शकतो. मंगळवारपासून हा शेअर हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. मात्र, काही काळानंतर प्रॉफिट बुकींग दिसली आणि शेअर 1 टक्क्यांहून अधिक घसरला.

विशेष म्हणजे, टाटा मोटर्सने दीर्घकाळात जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या हेवीवेट स्टॉकने 800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांचे मूल्य 5 वर्षांत 9 लाख रुपये झाले. त्यात 3 वर्षात 278 टक्के, 2 वर्षात 130 टक्के आणि गेल्या एका वर्षात 80 टक्के वाढ झाली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत स्टॉकचा परतावा 35 टक्क्यांहून अधिक आहे.

(टीप: ही फक्त शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारटाटाशेअर बाजार