Join us  

७२ रुपयांचा शेअर आला ५६८० वर; Tata Group च्या 'या' शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:32 PM

टाटा समूहाच्या या कंपनीचं मार्केट कॅप 28560 कोटी रुपये आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय.

Tata Investment Corp Share : टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनं (Tata Investment Corp Share) कोरोना संकटाच्या काळात 27 मार्च 2020 रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 630 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून 800 टक्के बंपर परतावा दिला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ही टाटा समूहाची कंपनी असून तिचे मार्केट कॅप 28560 कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर्स डिसेंबर तिमाही निकालानंतर मंगळवारी 17.53 टक्क्यांनी म्हणजेच 850 रुपयांच्या वाढीसह 5680 च्या पातळीवर पोहोचले.टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प कंपनीच्या शेअर्सची ही 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. 52 आठवड्यांच्या 1730 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्सनं गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा दिलाय.

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्सनं गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा दिला आहे तर, गेल्या 1 महिन्यात 33 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 दिवसांत, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा दिला आहे आणि शेअर 1100 रुपयांनी वाढून त्यानं 5685 रुपयांची पातळी ओलांडली आहे.

72 रुपयांवर होता शेअर

6 जानेवारी 1999 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स 72 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होते, तेथून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 7730 टक्के बंपर परतावा मिळाला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशननं नुकतेच चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 53 टक्क्यांनी वाढला असून तो 53 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. या कारणामुळे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​शेअर्स एका दिवसात 18 टक्क्यांनी वाढले आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार