टाटा शमूहाच्या अधिकांश कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्ममध्ये जबरदस्त परतावा दिला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास टाटा मोटर्सचे देता येईल. या कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना गेल्या 2 दशकांत 1370 टक्क्यांचा परतावा दिला आहे. अर्थात दीर्घकाळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 हे वर्षही गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिले आहे.
गेल्या 20 वर्षांपूर्वी, ज्या गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्समध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली केली असेल, त्यांचे आता 10 हजारचे 1.4 लाख रुपये झाले असतील. 5 वर्षांपूर्वी शेअरची खरेदी करून ते आतापर्यंत होल्ड करून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना 144 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत आपल्या धोरणात मोठा बदल केला आहे. कंपनीचा फोकस भारतीय बाजारात अनुकूल आणि स्वस्त कार तयार करण्याचाही आहे. आता कंपनी ईव्ही सेक्टरमध्ये वेगाने पुढे जात आहे.
आणखी एक गूड न्यूज -
कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक गूड न्यूज म्हणजे, तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येत आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षात आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरच्या किंमतीत 50 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला अपेक्षेपेक्षाही अधिक नफा झाला आहे. जून क्वार्टरमध्ये टाटा मोटर्सचा निव्वळ नफ्यात 42 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. यानंतर, कंपनीचा एकूण निव्वळ नफा 50007 कोटी रुपये येवढा आहे.