Tata Motors Share: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा फायदा अनेक कंपन्यांना झाला. देशातील दिग्गज टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाली. शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान मंगळवारी(दि.27) शेअरने सार्वकालिक उच्चांक गाठला. या वाढीमुळे टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 3.52 लाख कोटी रुपये झाले.
मंगळवारी टाटा मोटर्सचे शेअर्स 936.75 रुपयांवर उघडले आणि ट्रेडिंगदरम्यान 965 रुपयांपर्यंत गेले. शेवटी शेअर 962.55 रुपयांवर बंद झाले. ही या शेअरची आजपर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. विशेष म्हणजे, टाटा मोटर्सच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 128 टक्के मजबूत परतावा दिला आहे. तर या लार्ज कॅप कंपनीमुळे गेल्या 5 वर्षांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 434 टक्के परतावा मिळाला आहे.
असा आहे शेअरचा इतिहास...या शेअरचा 2020 पासूनचा रेकॉर्ड पाहिला तर, या टाटा स्टॉकने गुंतवणूकदारांचे नशीब पालटले आहे. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत फक्त 65.20 रुपये होती, जी सोमवार(27 फेब्रुवारी 2024) रोजी 965 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच या काळात त्यात गुंतवलेली रक्कम एक-दोन नव्हे तर जवळपास 15 पटीने वाढली आहे. जेएम फायनान्शियलने या शेअरची लक्ष्य किंमत रु. 1000 ठेवली आहे.
कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहेकंपनीने अलीकडेच डिसेंबर 2023 मध्ये तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. टाटा कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 137 टक्क्यांनी वाढून 7,025 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा 2,958 कोटी रुपये होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टाटा मोटर्सचा महसूल तिसऱ्या तिमाहीत 25 टक्क्यांनी वाढून 1,10,577 कोटी रुपये झाला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 88,488 कोटी रुपये होता.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)