Join us  

TATA Power Share: ₹५०० च्या वर जाणार TATAच्या 'या' शेअरची किंमत, ब्रोकरेज बुलिश; वाढला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 2:25 PM

TATA Power Share: कंपनीच्या शेअरमध्ये आज कामकाजादरम्यान मोठी तेजी दिसून आली. विदेशी ब्रोकरेज फर्म यूबीएसनं कव्हरेज सुरू केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

Tata Power Share Price: टाटा पॉवरच्या शेअरमध्ये आज कामकाजादरम्यान मोठी तेजी दिसून आली. विदेशी ब्रोकरेज फर्म यूबीएसनं कव्हरेज सुरू केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. यूबीएसनं टाटा पॉवरचे शेअर्स 'बाय' रेटिंगसह कव्हर करण्यास सुरुवात केली. ब्रोकरेज कंपनीनं याला ५१० रुपयांचं टार्गेट प्राइस दिलंय, ज्यामुळे सध्याच्या पातळीपेक्षा त्यात सुमारे २१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवर सर्व डायमेंशनमध्ये एनर्जी ट्रान्समिशन स्वीकारत आहे, ज्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा ब्रोकरेज कंपनीनं व्यक्त केली आहे.

ब्रोकरेजनं दिलेल्या माहितीनुसार एनर्जीशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषत: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात मजबूत संधी आहेत. रिन्यूएबल एनर्जी व्हॅल्यू चेनशी निगडीत टाटा पॉवरच्या व्यवसायात मजबूत एबिटडा वाढ आहे. यामुळे रिन्यूएबल एनर्जीची निर्मिती, सौर उपकरणांची निर्मिती, मोठ्या प्रमाणात ईपीसी प्रकल्प आणि पंप्ड स्टोरेज यांचा समावेश आहे.

टाटा पॉवरचे शेअर्स सध्या आर्थिक वर्ष २०२६ च्या अंदाजित पी/बीव्हीच्या ३.३ पट आणि ईव्ही/एबिटडाच्या ११.६ पट व्यवहार करत आहेत. यूबीएसच्या मते, रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील एकूण संधी आणि टाटा समूहाच्या कंपनीची मजबूत उपस्थिती पाहता हे मूल्यांकन अगदी वाजवी आहे. आज कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर मोठ्या तेजीसह ४४४.६० रुपयांवर व्यवहार करत होता.

काय म्हणालेले चेअरमन?

टाटा पॉवरचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी आर्थिक वर्ष २०२४ च्या निकालानंतर भागधारकांना संबोधित केलं होतं. कंपनी चालू आर्थिक वर्षात सुमारे २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये केलेल्या १२,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त ही गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीचा मोठा भाग कंपनीच्या रिन्यूएबल एनर्जी पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी आणि उर्वरित ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात असेल, असंही ते म्हणाले. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार