Lokmat Money >शेअर बाजार > Tata Share: Tata च्या 'या' शेअरने दिले जबरदस्त रिटर्न्स; 6 महीन्यात गुंतवणूकदार मालामाल...

Tata Share: Tata च्या 'या' शेअरने दिले जबरदस्त रिटर्न्स; 6 महीन्यात गुंतवणूकदार मालामाल...

Share Price: तुमच्याकडे टाटा समुहाच्या 'या' कंपनीचे शेअर्स आहेत का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:44 PM2022-12-12T19:44:13+5:302022-12-12T19:45:14+5:30

Share Price: तुमच्याकडे टाटा समुहाच्या 'या' कंपनीचे शेअर्स आहेत का..?

Tata Share: Tata steels Share Gives Tremendous Returns In 6 months | Tata Share: Tata च्या 'या' शेअरने दिले जबरदस्त रिटर्न्स; 6 महीन्यात गुंतवणूकदार मालामाल...

Tata Share: Tata च्या 'या' शेअरने दिले जबरदस्त रिटर्न्स; 6 महीन्यात गुंतवणूकदार मालामाल...

Share Market: शेअर बाजारात (Share Market) असे अनेक शेअर्स आहेत, ज्यात गेल्या काही महिन्यात सातत्याने वाढ होत आहे. या शेअर्समध्ये अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे. यातच टाटा समूहाचे अनेक शेअर्सदेखील आहेत, ज्यामध्ये बऱ्याच काळापासून तेजी दिसून येत आहे. यातील एक शेअर टाटा स्टील(Tata Steel)चाही आहे. टाटा स्टीलच्या शेअरच्या किमतीत  (Tata Steel Share Price) सलग काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. गेल्या 6 महिन्यांत टाटा स्टीलच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

शेअरमध्ये वाढ
12 डिसेंबर 2022 ला NSEवर टाटा स्टील 1.5 रुपये (1.36%) च्या वाढीसह 111.95 च्या पातळीवर बंद झाला. टाटा स्टील आताही आपल्या 52 आठवड्यांच्या हाय प्राइजपासून खाली तर 52 आठवड्यांच्या लो प्राइजपासून वर आहे. 6 महीन्यांपूर्वी टाटा स्टीलने 52 आठवड्यांचा लो प्राइज हिट केला होता.

किती वाढ झाली
टाटा स्टीलची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 82.70 रुपये आहे. टाटा स्टीलने यावर्षी जून महिन्यात 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता पण तेव्हापासून या शेअरमध्ये तेजी आली आहे. आता टाटा स्टीलच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमतीपासून जवळपास 35% वाढली आहे. सध्या टाटा स्टीलचा शेअर रु.110 च्या वर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक सुमारे 83 रुपयांवरुन 110 रुपयांच्या वर गेला आहे.
 

Web Title: Tata Share: Tata steels Share Gives Tremendous Returns In 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.