आज पुन्हा एकदा टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारी विशेष ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले आणि बीएसईवर 156.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. हा कंपनीचा विक्रमी उच्चांकी स्तर आहे. याआधी शुक्रवारी टाटा स्टीलच्या शेअरच्या किमती 6 टक्क्यांहून अधिक वाढल्या होत्या.
शनिवारी बीएसईमध्ये टाटा स्टीलचे शेअर्स 152 रुपयांच्या पातळीवर उघडले. पण नंतर काही वेळाने ते 152.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. टाटा स्टीलला 150 रुपयांची पातळी ओलांडण्यात पहिल्यांदाच यश आलं आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,90,060.41 कोटी रुपये आहे. बीएसईमध्ये टाटा स्टीलची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 101.65 रुपये प्रति शेअर आहे.
एक्सपर्ट बुलिश (Tata Steel Target Price)
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, स्टॉक्सबॉक्सशी संबंधित विश्लेषक अवधूत बागकर म्हणतात, “टाटा स्टीलचा ब्रेकआउट 147.40 रुपये प्रति शेअर होता. आता हा स्टॉक 175 ते 185 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. एक्सपर्ट्सनं स्टॉप लॉस 135 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
मेहता इक्विटीशी संबंधित रियांक अरोरा म्हणतात की टाटा स्टील तेजीत दिसत आहे. हा शेअर हळूहळू 153 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. याची टार्गेट प्राईज 200 ते 225 रुपये प्रति शेअर आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)