Tata Group Stock To Buy: टाटा स्टीलचा (Tata Steel) शेअर सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवरून २२ टक्क्यांनी घसरला आहे. यावर्षी १८ जून रोजी टाटा समूहाच्या या शेअरने १८४.६० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि सध्या टाटा स्टीलचा शेअर १४५.४५ रुपयांवर आला आहे. अल्पावधीत टाटा स्टीलच्या शेअरने सहा महिन्यांत १३ टक्के, तीन महिन्यांत ९ टक्के आणि एका महिन्यात ३ टक्के घसरण करून गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.
२०२४ मध्येही टाटा स्टीलच्या शेअरने केवळ ४ टक्के परतावा दिला आहे. टाटा स्टीलचे शेअर्स वर्षभरात १३ टक्क्यांनी वधारले आहेत. असं असूनही ब्रोकरेज कंपन्या या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत आणि ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. टाटा स्टीलमध्ये एलआयसीचा ७.६३ टक्के हिस्सा आहे. हे प्रमाण ९५,२२,१२,८६८ शेअर्स इतकं आहे.
टार्गेट प्राइस काय?
जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गननं टाटा स्टीलवर आपली भूमिका कायम ठेवली असून १८० रुपये प्रति शेअरचे टार्गेट प्राइस निश्चित केलीये. तर सेंट्रम ब्रोकिंगनं टाटा स्टीलच्या शेअरसाठी १६८ रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलीये. अॅक्सिस सिक्युरिटीजने टाटा समूहाच्या शेअरसाठी १७५ रुपयांचे टार्गेट ठेवलं आहे. मॉर्गन स्टॅनलीनं आपलं 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवलं असून प्रति शेअर सुमारे १७५ रुपये टार्गेट प्राईज निश्चित केलीये.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)