Lokmat Money >शेअर बाजार > TATA चा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! गेल्या एक महिन्यापासून तेजीमध्ये, वाचा सविस्तर

TATA चा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! गेल्या एक महिन्यापासून तेजीमध्ये, वाचा सविस्तर

TATA मध्ये गुतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात अनेक शेअर्स लिस्टेड आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या असून अनेक छोट्या कंपन्यांचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:05 PM2023-01-17T19:05:48+5:302023-01-17T19:11:06+5:30

TATA मध्ये गुतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात अनेक शेअर्स लिस्टेड आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या असून अनेक छोट्या कंपन्यांचाही समावेश आहे.

tata steel share price know target price buy sell hold | TATA चा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! गेल्या एक महिन्यापासून तेजीमध्ये, वाचा सविस्तर

TATA चा 'हा' शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! गेल्या एक महिन्यापासून तेजीमध्ये, वाचा सविस्तर

TATA मध्ये गुतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात अनेक शेअर्स लिस्टेड आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या असून अनेक छोट्या कंपन्यांचाही समावेश आहे. गेल्या एक महिन्यापासून एका शेअरमध्ये वाढ झाली आहे. हळूहळू हा स्टॉक वरच्या दिशेने जात आहे आणि स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीतूनही वर गेला आहे. 

टाटा स्टील सध्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून देत आहे. गेल्या एका महिन्यात टाटा स्टीलच्या समभागात बरीच वाढ झाली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी टाटा स्टीलची बंद किंमत सुमारे 102 रुपये होती, तर आता 17 जानेवारी 2023 पर्यंत स्टॉक 120 रुपयांवर पोहोचला आहे. यासह, शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहे.

NSE वर टाटा स्टीलची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 82.70 रुपये आहे. तर त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 138.67 रुपये आहे. दरम्यान, जागतिक ब्रोकरेज जेफरीजने नुकतेच रु. 150 च्या लक्ष्य किंमतीसह खरेदी करण्यासाठी कंपनीवर आपले होल्ड रेटिंग सुधारले आहे, जे सध्याच्या बाजारभावापेक्षा 25 टक्क्यांहून अधिक वाढीची शक्यता दर्शवते.

झुनझुनवाला फॅमिलीचा छोट्या कंपनीवर बडा डाव

दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत सन फार्मा अॅडव्हँस्ड रिसर्च कंपनी (Sun Pharma Advanced Research) मध्ये स्मॉलकॅपमध्ये 1.79% वाटा खरेदी केला आहे. ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस झुंनझुनवालांकडे, फर्ममध्ये 62,92,134 इक्विटी शेअर्स अथवा 1.94 टक्के हिस्सेदारी आहे.

झुनझुनवाला फॅमिलीचा छोट्या कंपनीवर बडा डाव, 35 टक्के स्वस्त शेअरमध्ये खरेदी केली मोठी हिस्सेदारी

20,097.7 कोटी रुपयांचे शेअर -

कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, झुनझुनवाला यांच्याकडे अंदाजे 20,097.7 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या संपत्तीसह 21 स्टॉक्स आहेत. 2022 च्या डिसेंबर तिमाहीत त्यांनी जियोजित फाइनांशिअल, अॅप्टेक, केनरा बँक आणि एनसीसीसारख्या शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओतील इतर शेअर्समध्ये अर्थात सिंगर इंडिया, अॅग्रो टेक फूड्स, क्रिसिल, डीबी रियल्टी, Jubilant Pharmova, स्टार हेल्थ आणि Jubilant Ingrevia मध्येही हिस्सेदारी वाढवली आहे.

Web Title: tata steel share price know target price buy sell hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.