Tata Group Stock: टाटा स्टील लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज गुरुवारी घसरण झाली. टाटा स्टीलचा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळी १६८.९० रुपयांवर पोहोचले. परंतु कामकाजाच्या अखेरिस शेअरमध्ये घसरण दिसून आली असून शेअर्स १६३.०७ रुपयांवर बंद झाले. शेअर्समधील या तेजीमागे जून तिमाहीचे निकाल आहेत. जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ७५ टक्क्यांनी वाढून ९१८.५७ कोटी रुपये झाला आहे. खर्चात कपात झाल्यानं कंपनीला अधिक नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल ते जून तिमाहीत कंपनीला ५२४.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
जून तिमाही निकाल
या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न कमी होऊन ५५,०३१.३० कोटी रुपयांवर आलं. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ६०,६६६.४८ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा खर्च कमी होऊन ५२,३८९.०६ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ५८,५५३.२५ कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळानं टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडची उपकंपनी टीपीपीएलमध्ये २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
कंपनी योजना काय?
या योजनेअंतर्गत कंपनी एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये ३५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल आणि टीपीपीएलमधील २६ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करण्यासाठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) आणि टीपीपीएलसोबत शेअर खरेदी आणि भागधारक करार (एसपीएसए) करेल.संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षात कंपनीची उपकंपनी नीलांचल इस्पात निगम लिमिटेडचे (एनआयएनएल) शेअर्स खरेदी करण्यासाठी एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये ६,००० कोटी रुपये गुंतविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली.
कंपनीचे शेअर्स
जागतिक ब्रोकरेज फर्म सीएलएसएने टाटा स्टीलवर 'अंडरपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवले असून १३५ रुपये प्रति शेअरचे टार्गेट प्राइस ठेवलं आहे. टाटा स्टीलवर जेफरीजनं 'बाय' रेटिंग दिलं असून प्रति शेअर १९५ रुपये टार्गेट ठेवण्यात आलं आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यात वर्षभरात ३१ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांत त्यात ३०० टक्के वाढ झाली आहे. टाटा स्टीलमध्ये एलआयसीचा मोठा हिस्सा आहे. टाटा स्टीलमध्ये एलआयसीचे ९५,२५,३१,६५० शेअर्स म्हणजेच ७.६३% शेअर्स आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)