Tata stock to buy: तुम्ही टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टाटा स्टील (Tata Steel) तुमच्यासाठी एक फायदेशीर सौदा ठरू शकतो. कारण, ब्रोकरेज हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. टाटा स्टीलचे शेअर आज 107 रुपयांवर व्यवहार करत आहेत. ब्रोकरेजने याची टार्गेट किंमत 130 रुपये ठेवली आहे. टाटा स्टीलला कव्हर करणाऱ्या 27 पैकी 12 ब्रोकरेजने Strong Buy चे टार्गेट दिले आहे. तसेच, इतर 9 ने यावर बाय रेटिंग ठेवली आहे.
कश आहे कामगिरी?टाटा स्टीलच्या शेअरमध्ये एका वर्षात 17% घट झाली आहे. तर, गेल्या एका महिन्यात स्टॉक 0.87% कमी झाला आहे. टाटा स्टीलचा हिस्सा यावर्षी YTD मध्ये 9.60% घसरला आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 1,31,791.71 कोटी रुपये आहे. 6 एप्रिल 2022 रोजी शेअरने 138.63 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि 23 जून 2022 रोजी 82.71 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.
ब्रोकरेजने काय म्हटले?कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने टाटा स्टीलचे खरेदी रेटिंग रु. 130 च्या लक्ष्यित किंमतीसह कायम ठेवले आहे. टाटा स्टीलचा स्टॉक आकर्षक स्थितीत आहे. हा शेअर कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजसाठी 'बाय' आहे. ब्रोकरेज फर्मला सध्याच्या पातळीपासून या स्टॉकमध्ये 22% ची चढ दिसत आहे आणि त्यामुळेच 130 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
डिसेंबर तिमाही निकालचालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा स्टीलला 2,502 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वाढत्या खर्चामुळे त्यांच्या नफ्यात ही घसरण झाल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 9,598.16 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही 60,842 कोटी रुपयांवरून 57,354 कोटी रुपयांवर आले आहे.