Join us  

टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:42 AM

टाटा टेक्नॉलॉजीजच्याआयपीओमध्ये गुंतवणूकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीनं आयपीओसाठी (Tata Technologies Price band) प्राईज बँड जाहीर केली आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टाटा समूहाच्या या आयपीओसाठी प्राईज बँड ४७५ ते ५०० रुपय निश्चित करण्यात आलाय. अनलिस्टेड मार्केट च्या तुलनेत हा प्राईज बँड ४७.४ टक्के स्वस्त आहे. टाटा टेक्‍नॉलॉजीजचा आयपीओ अनलिस्टेड मार्केटमध्‍ये सुमारे ९५० रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.काय आहे लॉट साईज?किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३० शेअर्सचा एक लॉट असेल. यामुळे गुंतवणूकदारांना किमान १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकतो. टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) आयपीओ २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.ग्रे मार्केटमध्ये तेजीकंपनीला ग्रे मार्केटमधूनही चांगली बातमी मिळाली आहे. टॉप शेअर ब्रोकरच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे शेअर्स आज म्हणजेच गुरुवारी ग्रे मार्केटमध्ये २९८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. येत्या काही दिवसांत जीएमपीच्या परिस्थितीत कोणताही मोठा बदल झाला नाही, तर कंपनीची लिस्टिंग ८०० रुपयांच्या आसपास असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. टाटा टेक्नॉलॉजीजचे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळवू शकतात.

टाटा समूहाच्या या आयपीओच्या शेअर्सचे अलॉटमेंट १ डिसेंबर २०२३ रोजी केलं जाईल. त्याच वेळी, कंपनीची शेअर बाजारात ४ डिसेंबर २०२३ रोजी लिस्ट होऊ शकतो. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजने कर्मचाऱ्यांसाठी २ लाख ३ हजार शेअर्स रिझर्व्ह ठेवले आहेत.

कंपनीची स्थिती कशी?टाटा टेक्नॉलॉजीजसाठी जुलै ते सप्टेंबर २०२३ हा महिना उत्तम राहिला आहे. या दरम्यान कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३६ टक्क्यांची वाढ दिसून आली. सुरू आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण निव्वळ नफा ३५१.०९ कोटी रुपये राहिला. तर महसूल वार्षिक आधारावर ३३.८ टक्क्यांच्या वाढीसह २५२६.७० कोटी रुपये राहिला.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबी